Tiger च्या तिन्ही चित्रपटांमुळे माझं करिअर… टायगर 3 निमित्त सलमानने व्यक्त केल्या भावना
Tiger : टायगर (Tiger) या समलमान खानच्या चित्रपट मालिकेचा तिसरा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच हा चित्रपट 100 कोटी कमवून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईमध्ये घट होत आहे. त्यानिमित्त सलमान खानने या चित्रपटाविषयी आणि आपल्या करिअरविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाला सलमान खान?
टायगर 3 च्या निमित्ताने तिन्ही टायगरवर बोलताना सलमान खान म्हणाला की, टायगर चित्रपटांच्या मालिकेतील तिनही चित्रपट हे तीन यशोगाथा आहेत. या तिनही चित्रपटाचं माझ्या मनात एक वेगळं स्थान आहे. तसेच या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात देखील आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटांनी खूप प्रेम मिळवलं. त्यांना एक ब्रॅंड म्हणून वारसा आहे. त्यामुळे माझ्या चित्रपटांतील करिअरला आणखी झळाली आहे. अशा शब्दांत सलमानने या चित्रपटांबजद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘एक अपघात अन्…’; पंकज त्रिपाठींच्या ‘कडक सिंग’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
पुढे तो म्हणाला जेव्हा मी एक था टायगर करत होतो. तेव्हा मला कल्पाना नव्हती की, आम्ही याचा सिक्वेल करू म्हणून. तर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे आता 2012 पासून या चित्रपटांचा जगभरात स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. तसेच कोणत्याही यशस्वी चित्रपटांच यश हे त्याच्या कथेमध्ये दडलेलं असतं.
‘पनौती’मुळे भारताचा पराभव; राहुल गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल, भाजपकडून प्रत्युत्तर
तसेच टागरच्या चित्रपट मालिकेने भारतीय प्रेक्षकांना एक देसी स्पायचा अनुभव दिला आहे. त्याच्या सारखं प्रेम प्रेक्षकांनी आतापर्यंत कशावरही केलेलं नाही. मी टायगर जगलोय आणि टायगरमध्ये श्वास घेतलाय. त्यामुळे मी आणि टायगर प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं आहे. त्यामुळे.
दरम्यान हा चित्रपट 100 कोटी कमवून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईमध्ये घट होत आहे. ‘टायगर 3’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. दिवाळीमध्ये सिनेमागृहात या सिनेमाचा चांगलाच बोलबाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी मात्र या सिनेमाच्या कमाईमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे.