Ajit Pawar on Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे (Ajit Pawar) यांना नाव न घेता शाब्दिक टोला लगावला आहे. आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेत त्यांच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची नेहमीच भूमिका आहे, असे अजित पवार म्हणाले तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आम्हाला राजकारण करायचं नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर जिल्ह्यातील सुपा या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय भाष्य केले. यावेळी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही लोक सध्या आरक्षण मागत आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर पुढे नतमस्तक होतो. मी त्यांचा वारसा घेऊन चाललो आहे. आजवर ज्यांना ज्यांना आरक्षण मिळाले त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे.
मात्र या माध्यमातून वातावरण खराब होऊ देऊ नका. पुढे जाऊन ओबीसी, मराठा समाज तसेच आदिवासी समाज तसेच इतर समाज यांनी वेगळी भूमिका घेतली तर जातीजातीमध्ये दोन धर्मांमध्ये अंतर पडून जमणार नाही. प्रश्न सर्वांचे योग्य असतील या शंका नाही, असे अजित पवार म्हणाले.
Pune : भिडेवाडा स्मारक प्रश्न सुटला; सुप्रीम कोर्टातील खटला मनपा, राज्य सरकारने जिंकला
आम्ही देखील आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी प्रयत्न केला. मात्र काही वेळा तो निर्णय हायकोर्टात टिकला नाही. काही वेळा सुप्रीम कोर्टात टिकला नाही. आम्ही चांगल्या भावनेनेच यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. आम्हाला माणसं जोडायचे असून आम्हाला राज्याला पुढे न्यायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.
ते पुढं म्हणाले की राज्याला पुढे नेता असताना कायद्याच्या चौकटीमध्ये तसेच न्यायव्यवस्थेला न्यायव्यवस्थेला मान्य होईल, असा आपण यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहोत, मात्र सध्या काहीजण समजून घेत नाहीत, तर काहीजण अत्यंत टोकाच बोलतायत. मात्र तरीदेखील आम्ही तुम्हाला साथ देणारी माणसं आहोत, अशा शब्दात अजित पवार यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांना शाब्दिक टोला लगावला आहे.
Letsupp Special : बोरवणकरांच्या आरोपांमुळे अजितदादा अडचणीत; पण ‘तो’ बिल्डर नेमका होता तरी कोण?
तुम्ही मनामध्ये कुठलेही तीळमात्र शंका आणू नका. आरक्षणासाठी आम्ही मोठमोठ्या वकिलांशी चर्चा सुरू असून कोर्टाने आरक्षणाची मागणी का नाकारली यावरती देखील चर्चा सुरू आहे. यामधून काय मार्ग काढता येईल व इतरांच्या आरक्षणाला देखील धक्का लागणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.