Download App

Maratha Reservation : ‘त्या’ पापाचे प्रायश्चित भोगावेच लागेल! मंत्री विखेंचा ‘मविआ’वर घणाघात

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना (Maratha Reservation) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. केवळ महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण गेले. यावर आज कुणीच बोलायला तयार नाही. या पापाचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल, अशी जहरी टीका मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांतूनच कुणबी दाखले शोधण्याची मोहिम सुरू झाली. राज्य सरकारने सर्वेक्षणही सुरू केले. आता या मुद्द्यावर व्यक्तिगत हेवेदावे सुरू झाले तर मूळ मुद्दा बाजूला पडेल. राजकीय वळणही लागेल त्यातून आपणच आपल्या समाजावर केल्यासारखे होईल. त्यामुळे सर्वच समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगावा असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Sujay Vikhe : ग्रामपंचायत रणधुमाळी! खासदार विखेंनी दिला विजयी उमेदवारांना ‘कानमंत्र

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा आता यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय करण्याची सरकारची भूमिका आहे, असेही मंत्री विखे यांनी स्पष्ट केले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण होणे राज्याच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट नाही, असे विखे पाटील म्हणाले.

24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा संघर्ष अटळ – जरांगे 

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपोषण स्थगित केले असले तरी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. बुधवारी सकाळपासून आंतरवाली सराटी येथून दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिला. राज्य सरकारने 24 डिसेंबरच्या आता मराठा आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Manoj Jarange : 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या, अन्यथा.. मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच घेणार आहोत. मराठा समाजासाठी 75 वर्षांमध्ये कोणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर आम्ही मांडणार आहोत. पण आज मराठा समाजाचा अजेंडा एकच आहे की, मागचं काय झालं? हे 24 डिसेंबरपर्यंत आम्ही काढत नाही, पण त्यानंतर मात्र कोणालाही सुट्टी नाही असेही जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत सांगितले होते.

 

follow us