Sujay Vikhe : ग्रामपंचायत रणधुमाळी! खासदार विखेंनी दिला विजयी उमेदवारांना ‘कानमंत्र’

Sujay Vikhe : ग्रामपंचायत रणधुमाळी! खासदार विखेंनी दिला विजयी उमेदवारांना ‘कानमंत्र’

Sujay Vikhe : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचातींच्या निवडणुका (grampanchayat election)पार पडल्या. निकालही जाहीर झाले. या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचं (BJP)वरचढ राहिल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो आहे. दरम्यान भाजपच्या विजयी उमेदवारांचे खासदार सुजय विखे Sujay Vikhe यांनी अभिनंदन केले. तसेच या उमेदवारांना विखेंनी कानमंत्र देखील दिला. जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थकी लावून जनतेच्या विविध अडचणी समजून घेण्याचे काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे व जनतेचे सेवक म्हणून प्रामाणिक काम आपल्या माध्यमातून घडावे असा सल्ला खासदार सुजय विखेंनी दिला.

“बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष”; ठाकरेंची CM शिंदेंवर बोचरी टीका

नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. गावात खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले(Shivaji Kardile), भाजपप्रणित समृद्धी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करत निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन आनंद साजरा केला.

Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा तटकरेंनी मला दम भरला होता; आव्हाडांचे तटकरेंवर गंभीर आरोप

दरम्यान खासदार विखे यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा अतिशय उत्साहात सत्कार केला व त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावाचा विकास साध्य करण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले.

खासदार सुजय विखे यावेळी म्हणाले की, वडगाव गुप्ता या गावासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. जी विकासाची वाटचाल सध्या सुरू आहे, ती अशीच निरंतर चालू राहील असा विश्वास व्यक्त केला.

तसेच सर्व विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केले की, जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थकी लावून जनतेच्या विविध अडचणी समजून घेण्याचे काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे. जनतेचे सेवक म्हणून प्रामाणिक काम आपल्या माध्यमातून घडावे,असाही सल्ला खासदार विखेंनी नवनिर्वाचित सदस्य आणि सरपंचांना यावेळी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube