Download App

Maratha Reservation ची मशाल नगरमध्येही पेटली; सकल मराठा अहमदनगर तर्फे उपोषण सुरु…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागला आहे. आरक्षण मिळावे यासाठी नगर शहरात देखील आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आज अहमदनगर शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील माळीवाडा येथील बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते दिल्लीगेटमार्गे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकापर्यंत हा मशाल मोर्चा निघणार आहे. दरम्यान मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Maratha Reservation चा मुद्दा पेटला, ठिकठिकाणी लालपरीला लागला ब्रेक!

सकल मराठा अहमदनगर तर्फे उपोषण सुरु…

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातून देखील सकल मराठा अहमदनगर तर्फे उपोषण सुरु करण्यात आले आहे. शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात गोरख दळवी, संतोष आजबे, नवनाथ काळे, अमोल हुंबे हे चार कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहे. त्यांच्या या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान मराठा आरक्षणाची हाक शासनापर्यंत शांततेच्या मार्गाने पोहचावी यासाठी आता नगरमधून देखील पुढाकार घेतला जाऊ लागली आहे.

Maratha Reservation : राजीनामा सत्र सुरुच! आतापर्यंत चार आमदार अन् दोन खासदारांनी उपसलं हत्यार

आज यासाठी मराठा समाजाच्या वतीने माळीवाडा एसटी स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दिल्ली गेट मार्ग चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पर्यंत हा मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजातील सर्वच बंधू-भगिनींनी या मशाल मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा समाज आक्रमक…

मराठा आरक्षण आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने गावोगावचे सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. आरक्षणासाठी वेगवेळ्या स्वरूपाची आंदोलने करणारे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरू लागले आहे.

follow us