Download App

Maratha reservation : जाळपोळीचं लोण आता नगरमध्येही, रोहित पवारांच्या मतदारसंघात जाळले टायर

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : 40 दिवसांची मुदत देऊनही मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा न निघाल्यानं मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. त्यांच्या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आरक्षणावरून वातावरण तापलं असून आंदोलनाने हिंसक रूप धारण केलं. आज दिवसभरात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्याची ठिणगी आता नगर जिल्ह्यातही पडली. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघात आंदोलक संतप्त झालेत.

World Cup 2023 : पुन्हा दे धक्का, अफगाणिस्तानकडून लंकेचे ‘वस्रहरण’… 

राज्याच्या कानाकोपऱ्यात आरक्षणाबाबत वातावरण तापले आहे. आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगले आंदोलकांनी पेटवून दिले. राज्यातील अनेक भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. जरांगेच्या उपोषणाला समर्थन म्हणून अनेक ठिकाणी साखळी उपोषण केली जात आहेत. नगर जिल्ह्यातही साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान, राज्यभर पसरत चाललेलं आंदोलनाच्या जाळपोळीचं लोन आता नगर जिल्ह्यातही पोहोचलं आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथेही सकल मराठा समाज बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी रस्त्यावर टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. त्यामुळं रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळं काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. यावेळी आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचे, मनोज जरांगे हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणाही दिल्या

आंदोलनाचा लढा सुरू…
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. यानंतर जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेतेही आक्रमक झाले असून विरोधकांनीही आरक्षणाची मागणी केली आहे

दरम्यान, उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळही उद्या मुंबईत चर्चेसाठी येणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकार काय निर्णय घेते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us