World Cup 2023 : पुन्हा दे धक्का, अफगाणिस्तानकडून लंकेचे ‘वस्रहरण’…

World Cup 2023 : पुन्हा दे धक्का, अफगाणिस्तानकडून लंकेचे ‘वस्रहरण’…

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानने पुन्हा एकदा मोठा उलटफेर केला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी आज 30 वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकेत सामना रंगला. या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करीत 241 धावांचा पल्ला गाठला होता. अफगाणिस्तानने 45.2 षटकांत 242 धावा केल्या आहेत.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाजांनी 50 षटकांत 241 धावा केल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानने प्रत्युत्तरात जोरदार बॅटिंग केली आहे. अफगाणिस्तान संघाकडून रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी अर्धशतके ठोकली आहेत. या स्फोटक फलंदाजांच्या धावांमुळे अफगाणिस्तान संघ 45.2 षटकांत 3 बाद 242 धावा करुन सामना जिंकला आहे.

Maratha Reservation : चाळीस दिवस सरकारने काय केलं? अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नव्हती. रहमान उल्ला गुरबाज पहिल्याच षटकात क्लीन बोल्ड झाला. या फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. तर इब्राहिम झद्रान आणि रहमत यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी झाली. झाद्रानला केवळ 39 धावा करता आल्या. रहमत शाह 74 चेंडूत 62 धावा करुन बाद झाला. यानंतर हशमतुल्ला शाहिदी आणि उमरझाई यांनी अफगाणिस्तान डाव सावरला. दोघांनी आपली विकेट पडू दिली नाही आणि संघाला विजयापर्यंत नेले. हशमतुल्ला शाहिदीने 74 चेंडूत 58 धावा केल्या तर उमरझाईने 73 धावांची नाबाद खेळी केली.

‘फडणवीस हे राज्यघटनेबाबत अज्ञानी’; शिंदेंबद्दलच्या वक्तव्यावर उल्हास बापट यांची सडकून टीका

अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 49.3 षटकांत सर्व गडी गमावून 241 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर दुसरीकडे, अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने सर्वाधिक 4 बळी घेतले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने सहाव्या षटकात दिमुथ करुणारत्नेची विकेट गमावली. त्याला केवळ 15 धावा करता आल्या.

मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा, योग्य निर्णयाचे प्रयत्न सुरु : फडणवीसांची जरांगेंना कळकळीची विनंती

पथुम निसांका 60 चेंडूत 46 धावा करुन बाद झाला. कुसल मेंडिसने 50 चेंडूत 39 धावा केल्या. यानंतर श्रीलंकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. सदीरा 36 धावा करुन बाद झाली. सिल्वाला केवळ 14 धावा करता आल्या. अस्लंकाने 22 धावांची इनिंग खेळली. तर चमीरा धावबाद झाला. तीक्षणाने 31 चेंडूत 29 धावा केल्या. मॅथ्यूजने 26 चेंडूत 23 धावा केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube