Chhagan Bhujbal Comment on Ajit Pawar Chief Ministership : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत (Ajit Pawar) अशी चर्चा राज्याच्या राजकारणात पुन्हा सुरू झाली आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का? या प्रश्नावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या (Chhagan Bhujbal) मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भुजबळ यांनी आज नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी त्यांना अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, आम्हालाही सगळ्यांना वाटतं, का वाटू नये? आपल्या पक्षाचा जो कुणी नेता असेल तो जास्तीत जास्त मोठ्या पदावर गेला पाहिजे, अशी अपेक्षा असते. त्यात काय वाईट आहे? सगळ्याच पक्षांतील नेत्यांची आपल्या नेतृत्वाबद्दल तशी इच्छा असते.
पराभवानंतर ब्लॅकमेलिंग सुरू केलं; संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
ठाकरे गटाच्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, भास्कर जाधव शिवसेनेत असल्यापासून आमचे मित्र आहेत. त्यांनी राजकारणातलं काम थांबवावं असं त्यांचं वय नाही. मित्र म्हणून मी त्यांना हेच सांगेल. राजकारण चढ उतार होत असतात. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. राजकारण एकदम सोडून देणे असं जाहीर करणं मनाला पटत नाही. त्यामुळे मी त्यांना इतकंच सांगेन की राजकारणातून निवृत्त होऊ नका.
इच्छा असण्यात वाईट काय? मुख्यमंत्रिपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटते की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं काय आहे? विशेष म्हणजे अजित पवार यांनीही आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी लपवून ठेवली नाही. त्यांनी वेळोवेळी आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सांगितले.