Nashik News : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा अजब सल्ला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यावरून टीका-टिप्पणी सुरू असताना दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या भावावरून एक विधान केले आहे. दादा भुसे यांनी कांदा उत्पादकांची बाजू घेताना दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते असे वादग्रस्त विधान केले आहे.
Onion Price : कांद्याच्या भावाचा वांदा थोपविण्यासाठी ‘कृषी अभ्यासकांनी’ सुचविले दोन उपाय!
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी केंद्राने निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केले आहे. त्याविरोधात कांदा उत्पादक आक्रमक झाले आहेत. नाशिक ही सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. निर्यात शुल्कावरून नाशिकमधील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहे. केंद्राच्या या निर्णयाने कांदा उत्पादकासाठी व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.
यावर बोलताना भुसे म्हणाले, कांदा जास्त दिवस टिकत नाही. कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी खर्च जास्त लागतो. तो निघत नाही. कांदा 20 ते 25 रुपये किलो झाल्यावर तो कुणाला परवडत नसेल तर त्याने दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडते ? असे विधान भुसे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबाला चार पैसे मिळणार असेल तर त्याची तशी मानसिकता दिसली पाहिजे, असेही भुसे म्हणाले.
Rajasthan politics: वसुंधरा तेरी खैर नहीं : मोदी- शाहांचा पुन्हा नारा
केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्यात शुल्कावर भुसे म्हणाले, पाठीमागच्या काळात कांदा चारशे-पाचशे रुपये क्विंटल होता. त्यावेळी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला. नाफेडने हस्तक्षेप केल्याने दोनशे-पाचशे दर वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला होता. हीही वस्तुस्थिती असल्याचे सांगत केंद्राच्या निर्णयाने एका अर्थाने समर्थन केले आहे.
भुजबळांना फटकारले
मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत. त्याचा शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका बसत असल्याचे म्हटले होते.त्याला उत्तर देताना भुसे म्हणाले, निर्यात शुल्काचा निर्णय कालच झाला आहे. त्यामुळे आताच कांद्याचे भाव कमी होऊन शेतकऱ्यांना फटका होत आहे, असे सांगणे योग्य ठरत नाही.