Radhakrishna Vikhe Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, हा तिढा अद्याप न सुटल्यानं जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आहे. माझ्याविरोधात फडणवीस इतरांना बोलायला लावत आहेत. ते मराठे मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत, असा आरोप जरांगेंनी केला. दरम्यान, जरांगेकडून होत असलेल्या टीकेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्युत्त दिलं.
काठावरील बहुमताचा मोदी सरकारला फटका : वक्फ बोर्डाचे विधेयक लोकसभेत लटकले
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये, असे म्हणत विखे पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.
राधाकृष्ण विखेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जरागेंविषयी विचारल असता ते म्हणाले, जरांगेंनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये, आरक्षणाच्या आडून फडणवीसांवर टीका करण्याचं जरांगेंनी थांबवावं असं विखे म्हणाले. यावेळी त्यांनी जरांगेंवर टीकाही केली. मनोज जरांगे यांनी गोलमेज परिषद घ्यावी आणि त्यात काँग्रेसच्या बोलघेवड्या आणि उबाठाच्या स्वयंघोषित नेत्यांना बोलवावं. मग दूध का दूध पानी का पानी होईल, असं म्हणत विखेंनी जरांगेंवर तोफ डागली.
Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले, वलोकसभा निवडणुकीच्या वेळी जो नकारात्मक प्रचार झाला त्याला अनेक कंगोरे आहेत. गेले दोन वर्ष कॉंग्रेस मित्रपक्ष त्या विषयावर काम करत होते. निवडणूक काळात कॉंग्रेस नेत्यांनी नकारात्मकता पसरवली. लोकसभेतील त्याचं यश हे सर्वसामान्यांची दिशाभूल आणि बुद्धीभेद याचे यश आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा नाही. लोकांना त्यांची चूक कळली आहे. ज्या भ्रमात महाविकास आघाडीचे नेते वावरत आहे, त्यांचा भ्रमनिरास जनता लवकरच दूर करेल, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पश्चिम दौरा सुरू केला. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेतून ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला तीव्र विरोध होत आहे. त्यामुळं आरक्षणाचा तिढा आणखीनच कठीण होत चालला आहे.