खासदार वाकचौरेंसाठी मी त्यांची ढाल बनून उभा राहीन; आमदार अमोल खताळांचा थेट इशारा कुणाला ?

Amol Khatal- लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर मतदारसंघाचा विकास कामे करण्याची मोठी जबाबदारी असते.

Dr Amol Khatal

Dr Amol Khatal

MLA Amol Khatal On Bhausaheb Waghchaure: शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Waghchaure) शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी झाले. या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला आहे. संगमनेरचे शिवसेना आमदार खताळ (MLA Amol Khatal) यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. तसेच ज्या ठिकाणी खासदार वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी त्यांची ढाल बनून उभा राहीन अस वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केले.


Yoga Day : योग करा अन् तंबाखूची सवय सोडा; AIIMS च्या संशोधनातून मोठा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम करत आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे करत असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ पाटील यांनी काढले आहे. संगमनेर येथील बसस्थानक येथे शिवसेना स्थापनादिनाच्या निमित्त संगमनेर शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार खताळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर मतदारसंघाचा विकास कामे करण्याची मोठी जबाबदारी असते. विकासकामांना गती देण्यासाठी अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सत्तेसोबत राहून विकासाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे आमदार खताळे यांनी सांगितले.


उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला फसवत आहेत’; 6 नव्हे तर 7 खासदार फुटले होते, रामदास कदमांचा सनसनाटी दावा

ऑपरेशन टायगरबाबत भाष्य करताना आमदार यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले , तुमच्यासोबत असलेले तुमचे सहा खासदार जर तुम्हाला सोडून गेले असतील, तर त्यामागे काही ना काही कारण असणारच. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपले खासदार आपल्याला का सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. शिवसेना स्थापना दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून संगमनेर तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षवाढीसह जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

Exit mobile version