Shirdi Loksabha : उमेदवारीला विरोध तरी, ठाकरेंकडून वाकचौरेंना शिर्डीतून संधी

  • Written By: Published:
Shirdi Loksabha : उमेदवारीला विरोध तरी, ठाकरेंकडून वाकचौरेंना शिर्डीतून संधी

अहमदनगर : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उमेदवारीला मोठा विरोध होत असतानादेखील उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरेंना (Bhausaheb Waghchaure) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीत (Shirdi Loksabha) ठाकरेंची विजयाची मशाल पेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्मविराम मिळाला असून, ठाकरे गटाकडून वाकचौरे यांच्या हाती शिर्डी लोकसभेची मशाल देण्यात आली आहे. वाकचौरे यांच्या विरोधात आता महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  (Shirdi  Loksabha Uddhav Thackeray Announced Ticket To Bhausaheb Waghchaure)

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर : वाकचौरे, वाघेरेंसह पाचही विद्यमान खासदार रिंगणात

नगर जिल्ह्यात दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान नगर दक्षिणेमध्ये भाजपकडून यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर नाही. तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अखेर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी अद्याप महायुतीकडून वाकचौरे यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याबाबत अद्याप निश्चितता झाली नाही.

Lok Sabha Election: मोदींसाठी आरएसएस कशी ताकद लावतंय ? कसं आहे मायक्रो प्लॅनिंग

उमेदवारीला विरोध… तरी ठाकरेंकडून वाकचौरांना संधी

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव असल्याने या ठिकाणावरून उमेदवारीसाठी अनेक नेतेमंडळी हे इच्छुक होते. चौरे यांची उमेदवारी ही ठाकरे गटाकडून निश्चित मानले जात होती. मात्र वाकचौरे यांना स्व पक्षातूनच विरोध होऊ लागला होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडण्यात आली तर उत्कर्षा रुपवते या देखील इच्छुक होत्या. मात्र शिर्डी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गट नक्की लढणार हे मात्र निश्चित होते. यामुळे भाऊसाहेब वाकचौरे उमेदवारी प्रबळ मानली जात होती.

दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शिर्डी मधून कोण उमेदवार असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अखेर शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची मशाल वाकचौरे यांच्या हाती सोपविण्यात आली आहे.

ठाकरेंकडून वाकचौरे, वाघेरेंसह पाचही विद्यमान खासदार रिंगणात

ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या 17 उमेदवारांच्या यादीत वाकचैरे, वाघेरे यांच्यासह विद्यमान पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. यात माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरविण्यात आले आहेत. तर अन्य सात मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

विद्यमान पाच खासदारांसह पाच माजी खासदारांवर ठाकरेंची मदार :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबत राहिलेल्या विद्यमान पाचही खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात धाराशीवमधून ओमराजे निंबाळकर, ठाण्यातून राजन विचारे, परभणीतून संजय जाधव, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई आणि रायगडमधून अनंत गिते या माजी खासदारांना उमेदवारी घोषित झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube