Download App

…तर थेट माझ्याशी संपर्क साधा, आपत्तीग्रस्तांसाठी आमदार लहामटे सरसावले

MLA Kiran Lahamate यांनी मुसळधार पावसाने आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

MLA Kiran Lahamate Help People who Disaster struck Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासह राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यातच नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आता खुद्द अकोलेचे आमदार किरण लहामटे (MLA Kiran Lahamate) यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपत्ती ग्रस्त नागरिकांना थेट माझ्याशी अथवा माझ्या संपर्क कार्यालयाशी संवाद साधावा असे लहामटे म्हणाले आहे.

राजकीय पक्ष म्हणून भूमिका घेणार का? प्रकाश आंबेडकरांचा पवार – शिंदेंना थेट सवाल

नेमकं काय म्हणाले लहामटे?

अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात झाडे पडणे ,गावांचा संपर्क तुटणे घरांचे नुकसान होणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा. आपणास त्वरित मदत केली जाईल. असे लहामटे म्हणाले. आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे. नैसर्गिक अडचणीमध्ये म्हणजेच पूरपरिस्थितीमध्ये अडकल्यास नागरिकांनी थेट 9922846592 तसेच 9960696302 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आमदार किरण लहामटे म्हणाले आहे.

अजित पवारांवर टीका करणं टाळा, आम्हाला त्यांची गरज…; भाजप नेत्यांची संघाला विनंती

जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

जामखेड मोहरी परीसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने (Rain) नागरिकांची तारांबळ उडाली. जामखेड शहरातील शिवाजीनगर, (Ahmednagar ) संभाजीनगर तसेच जामखेड नगर रस्त्यावर आणि नाल्यात पूरसदृश पाण्यामुळे वाहतूक चार तास खोळंबली होती त्यामुळे परिसराचा संपर्क तुटला होता.

परिसरात झालेया जोरदार पावसामुळे परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते तर मोहरी परिसरात पावसामुळे नदी ओढ्याकाठची शेती वाहुन गेली. तर अनेक ठिकाणी पिके पाण्या खाली गेली आहेत. मोहरी तलाव या एकाच पावसाने ओव्हर फ्लो झाला आहे. तसंच, पाथर्डी तालुक्यात ७७ मि.मी. पाऊस झाला. जामखेड मंडळात ९३.५, खर्डा ९२.३, एवढा पाऊस झाला होता.

follow us