Download App

‘…तर आमचा प्रखर विरोध राहणार’; मुळामधून पाणी सोडण्यावरुन गडाख कडाडले

Mla Shankarrao Gadakh : मराठवाड्याला पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा पण मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका आमदार शंकरराव गडाख(Mla Shankarrao Gadakh) यांनी मांडली आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी शंकरराव गडाख बोलत होते.

“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

आमदार गडाख म्हणाले, यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाची कृपा कमी प्रमाणात झाल्याने जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. यातच मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतांना ‘समन्यायी’च्या नावाखाली मराठवाड्याला पाणी सोडणे हे अयोग्य आहे. यामुळे प्रामुख्याने नेवासा तालुक्यासाठी अन्यायकारक भूमिका होणार आहे. मराठवाड्याला खाली पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा पण मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध राहील. वेळ पडल्यास शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड आता ‘डेंजर झोन’मध्ये; वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचे संकट

तसेच मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतांना ‘समन्यायी’च्या नावाखाली मराठवाड्याला पाणी सोडणे अयोग्य आहे. मुळाचे पाणी राजकीय दबावाखाली जर जायकवाडीला सोडण्यास आले तर नेवासा तालुक्याला याचा मोठा फटका बसणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Terrorist : पाकिस्तानमध्ये जैशचा प्रमुख मसूद अझहरच्या साथीदाराची हत्या; दहशतवादी दाऊद मलिक ठार

जायकवाडीत पुरेसा पाणी साठा शिल्लक असतांना राजकीय दबावाखाली मुळाचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा घाट घातला जातो आहे. मात्र जर मुळा धरणातून खाली पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर लाभधारक शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी गडाख यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीकडून ‘दोन’ महिन्यांच्या वाढीव मुदतीची मागणी

दरम्यान, सध्या जिल्ह्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरु झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मुळा व भंडारदरा धरणाच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख हे गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत. नेवासा तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी गडाख यांनी रस्ता रोको तसेच विविध आंदोलने केली आहे. यंदाच्या वर्षी पावसाच्या अल्प प्रतिसादाने पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी मराठवाड्याला मुळा व भंडारदरामधून पाणी देण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी यावेळी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.

Tags

follow us