Download App

नगर जिल्ह्याचा बिहार झालाय, अतिक्रमण मोहिमेविरोधात खासदार लंकेंचा संताप

नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संताप व्यक्त केला.

  • Written By: Last Updated:

अहिल्यानगर : गुंडगिरी पध्दतीने पोलीस (Police) आणि महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संताप व्यक्त केला.

PMT ने फिरणाऱ्या नीलम गोऱ्हेंकडे आज महागड्या साड्या अन् सोन्याचे मॅंचिग नेकलेस…; सुषमा अंधारेंनी सगळचं काढलं

गुंडगिरी पध्दतीने, पोलीस, महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता सकाळी सात वाजता बुऱ्हानगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रूपयांचे मंगल कार्यालय उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर खा. निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राजकीय आकसातून अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खा. लंके म्हणाले, जिल्ह्यातील नागरीकांचे म्हणणे ऐकूण न घेता आकसापोटी त्यांचे अतिक्रमण सिध्द करून ते पाडण्याचा कट जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून रचण्यात येत आहे. जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अभिषेक भगत हे बुऱ्हानगर येथील देवीचे भक्त आहेत. तिथे त्यांचा स्वतःचाचे आउट असताना, सर्व कर भरण्यात आलेले असताना तसेच त्यांनी त्यांच्या जागेतून ग्रामस्थांसाठी रस्तेही काढून देण्यात आलेले आहेत. असे असताना सकाळी गुंडाराज पध्दतीने शंभर दिडशे पोलीस तसेच काही गुंड प्रवृत्तीचे लोकही तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि सर्व जमीनदोस्त करण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले.

भटकंती करायला आवडतं पण, ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलाय का? जाणून घ्या फायदे.. 

पालखीची मोडतोड
एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे काम करतो हे सांगायचे आणि दुसरीकडे २१०० वर्षांपूर्वीच्या पालखीची तोडफोड करायची, असा सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. त्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून तक्रार केल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

वडगांव गुप्ता येथे आदिवासींच्या झोपड्या उध्वस्त
वडगांव गुप्ता येथे आदिवासी भिल्ल समाजाचे कुटूंब ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे. कायद्याचा दुरूउपयोग करून या आदीवासी बांधवांच्या झोपडया जमीनदोस्त करण्यात आल्याचेही लंके यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई झाली पाहिजे
नगर शहरातही महापालिका आयुक्तांकडून चुकीच्या कारवाया करण्यात येत आहेत. लोकांकडे उतारे असतानाही त्यांचे म्हणणे एकूण न घेता गाळे जमीनदोस्त करण्यात आले. ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय अकासापोटी या कारवाया केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खा. लंके यांनी केली.

विरोधकांना टार्गेट केले जात आहे
ज्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणूकीत सत्ताधाऱ्यांचे काम केले नाही, अशा लोकांना ठरवून टार्गेट केलं जात आहे. त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकूण न घेता त्यास त्रास दिला जात आहे. त्यांचे राहते घर, व्यवसायाचे ठिकाण जमीनदोस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबले नाहीत तर आम्हाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत. वेगळया पध्दतीने समाजाला वेठीस धरले जाणार असेल तर त्यांना धडा शिकविण्याची ताकद आमच्यात आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला प्रखर विरोध करतील, असं लंके म्हणाले.

तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल !
महानगरपालिकेतील कारनामे बाहेर काढले तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल. महापालिका आणि महसूल प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई करू नये. अधिकाऱ्यांना फोन केल्यावर ते आमच्यावर दबाव असल्याचे सांगतात. अधिकाऱ्यांवर दबाव आहे म्हणून तुम्ही लोकांना उध्वस्त करणार का ? असा सवाल लंके यांनी केला.

जल जीवन मिशनमध्ये मोठा घोटाळा
ठराविक अधिकाऱ्याला एखाद्या पदावर बसविण्याचा घाट घातला जातो. कारण त्यामागे आर्थिक हितसबंध असतात. जल जीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचारावर आपण आवाज उठविला आहे. त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रयांची भेट घेउन भ्रष्टाराचे पुरावे, व्हिडीओ सादर केले आहेत. आएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची आपण मागणी केली आहे. हा नगर जिल्हयातील घोटाळा नसून राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. एखादी पाणी योजना झाल्यानंतर पुन्हा तीस वर्षे पाणी योजनेसाठी निधी मंजुर होत नाही. कागदोपत्री किंवा निकृष्ट दर्जाच्या या योजना होणार असतील, अर्धा फुटांवर पाईप गाडले जाणार असतील, ज्या कंपनीचे पाईप घेण्यासाठी मान्यता नाही, त्या कंपनीचे पाईप टाकले जाणार असतील आणि योजना पुर्णत्वास जाणार नसेल तर हे सर्व काही चुकीचे आहे, असंही लंके म्हणाले.

follow us