Download App

राहुल जगतापांचा रिमोट फडणवीसांकडे, संजय राऊतांचे टीकास्त्र, पाचपुतेंचाही घेतला समाचार

आमच्यावर आरोप करणाऱ्या राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी शेतकऱ्यांचा पैसा हडप केले, आता त्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे - राऊत

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : आमच्यावर आरोप करणाऱ्या राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी शेतकऱ्यांचा पैसा हडप केले, आता त्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यांना एक रस्ताही करता आला नाही, तर पाचपुते 40 वर्षे सत्तेत राहिले. त्यांनाही कुठला विकास केला नाही, आता फक्त एकदा अनुराधा नागवडेंना यांना संधी द्या, तुम्हाला तालुक्याचा आमदार कसा असतो हे आम्ही दाखवून देऊ, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) आणि राहुल जगताप यांच्यावर टीका केली.

महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणारच, रवींद्र चव्हाणांचा विरोधकांना धडकी भरवणारा दावा 

आज संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी श्रीगोंद्यात सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भोस, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते. यावेळी राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी नावाच्या व्यापाऱ्याने राज्यात असंवैधानिक पद्धतीने शिवसेना फोडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन पक्ष केले. लोकसभेत 400 पार करण्याचा नारा देणाऱ्या महायुतीला ब्रेक लावण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. आता आपल्याला विधानसभा जिंकायची आहे. श्रीगोंद्यात मशाल पेटणार आणि महाराष्ट्रात 170 जागांवर महाविकास आघाडी विजयी होणार असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

Vidhansabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवस तळ ठोकणार, पहिली सभा धुळ्यात 

पुढं ते म्हणाले, आमच्यावर आरोप करणाऱ्या राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांचा पैसा हडप केले अशा लोकांना महाविकास आघाडी उमेदवारी कशी देणार. आता त्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे जगताप यांना फडणवीस ऑपरेट करतात, जगतापांना एक रस्ता करता आला नाही. त्यांची आज निशाणी रोडलोर आहे, अशी टीका राऊतांना केली.

बबनराव पाचपुते 40 वर्षे सत्तेत राहिले. आता एकदा फक्त अनुराधा नागवडेंना यांना संधी द्या, तुम्हाला तालुक्याचा आमदार कसा असतो हे आम्ही दाखवून देऊ, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

follow us