Download App

मोठी बातमी! भिंगार शहराचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा, खासदार विखेंची मोठी घोषणा

Ahmednagar : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board)समावेश अहमदनगर महानगरपालिकेत (Ahmednagar Municipal Corporation)करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिंगार शहराचा (Bhingar city)महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी गवाही खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी दिली. भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा अशी मागणी वेळोवेळी समोर आली. दरम्यान या निर्णयामुळे आता भिंगारकरांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे.

कर्नाटक गमावलं, तेलंगणाने नाकारलं; ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम अजूनही भाजपच्या टप्प्याबाहेरच

भिंगार शहराचा अहमदनगर महानगरपालिकेत समावेश करून घ्यायचा की नाही? या मुद्द्यावर आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. बैठकीला शहराचे खासदार आमदार संग्राम जगताप महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे, छावणी मंडळाचे आयुक्त भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर व भिंगार छावणी मंडळातील अनेक आजी-माजी सदस्य देखील उपस्थित होते.

‘हातात सत्ता राहिल वाटत होतं पण..,’; निवडणूक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

या बैठकीत विखेंनी भिंगार छावणी मंडळाचा महानगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश करण्यात यावा की नाही, याबाबत मत जाणून घेतली. तर या छावणीतून आमची सुटका करा, आमच्या समस्या सोडवा, भिंगार शहराला महापालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी एकमुखी उपस्थित नागरिकांनी केली. छावणीतून कशा प्रकारे त्रास दिला जातो? त्यांच्याकडे दुर्लक्ष कसे केले जाते? याचा पाढाच नागरिकांनी खासदार विखेंसमोर वाचला.

यावर बोलताना विखे म्हणाले की, भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न येत्या चार महिन्यात निकाली लागेल. त्यामुळे तुमची लवकरच सुटका होईल, अशी ग्वाही खासदार विखेंनी यावेळी भिंगारकरांना दिली.

येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि त्यांनंतरच्या काळात प्रशासकीय कारवाई पूर्ण झाल्यावर भिंगार छावणी मंडळ बरखास्त होऊन त्याचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत होईल, असे देखील यावेळी खासदार विखे म्हणाले.

Tags

follow us