Nashik Crime News : नाशिकच्या नामंकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण (Nashik Crime ) आणि धर्मांतर करण्याच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आला. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांचं पथक आयटी कर्मचारी बनवून कंपनीत पाठवत रॅकेटचा पर्दाफाश केलायं. यामध्ये खुद्द महिला पोलिस जी इंजिनिअर बनली, त्यांनी स्वत: अश्लील हावभाव आणि गैरवर्तनाचा अनुभव घेतलायं.
संशयित आरोपी मिटींच्या नावाखाली महिलांशी अश्लील गैरवर्तन कत असल्याची माहिती मिळताच महिला वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सात महिला कर्मचाऱ्यांचं पथक वेशांतर कंपनीत पाठवण्यात आलं. महिला पोलिसांच्या पथकाने कंपनीत वावर करीत असताना संशयित गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. या कंपनीत महिलांशी मिटींगमध्ये होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वत: डोळयांनी पाहिले आहेत. यासोबच 40 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना मुसक्या आवळल्या आहेत.
या नामंकित कंपनीत नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य केलं जात होतं. मुलाखतीनंतर आमच्यामुळेच तुला नोकरी मिळालीयं, असं सांगून महिला, तरुणीला उपकारांच्या ओझ्याखाली टाकलं जात होतं. पीडितेच्या तक्रारीवरुन सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आलायं. दरम्यान, केवळ महिलांचं शोषणच नाही तर एका तरुण पुरुष कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पडण्यात आल्याचं समोर आलंय. नोकरीच्या ठिकाणी धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करुन कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण केलं जात होतं.
काकीसाठी पुतण्या मैदानात…काँग्रेस अर्ज माघे घेणार, सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांना विश्वास
या प्रकरणात आतापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या रॅकेटमधील पाच मुख्य संशयितांना अटक केली आहे. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी संशयित आरोपींची नावे असून न्यायालयाने या पाचही आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
