Download App

Nashik : लासलगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

नाशिक ( Nashik )  जवळील लासलगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात ( Railway Accident )  झाला आहे. या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण भीषण जखमी आहे. हा अपघात आज ( 13 फेब्रुवारी ) रोजी पहाटे 5.44 च्या सुमारास झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या लासलगाव – उगाव ( Lasalgaon )  रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेले चारही कामगार हे गँगमन होते. यावेळी टॉवर म्हणजे लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन हे रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे चालले होते. यावेळी पोल नंबर 15 ते 17 मध्ये ट्रॅक मेंटेन करण्याचे काम चालू होते.

यावेळी ट्रेक मेंटेनकर कर्मचारी हे काम करत होते. दरम्यान याचवेळी रेल्वे लाईनच्या मेंटेनस करणाऱ्या टॉवरने जोरदार धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या कामगाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. संतोष भाऊराव केदार ( 38 ), दिनेश सहादु दराडे ( 35 ), कृष्ण आत्मराम अहिरे ( 40 ), संतोष सुखदेव शिरसाठ ( 38 ) अशी मृतांची नावे आहेत.

Tags

follow us