Nashik Crime : धर्मांच्या नावाखाली जबरदस्ती, ‘त्या’ प्रकरणावर चित्रा वाघ संतापल्या
नाशिक : नाशिक सिन्नर-एका महीलेचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याची घटना घडली. त्या प्रकरणावर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माहिती देत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘नाशिक सिन्नर-एका महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना घडली ज्यामध्ये 5 आरोपी आहेत. ज्यात पाश्टरचा मुख्य सहभाग आहे. या घटनेने पुन्हा एकदा जबरदस्तीने धर्मांतराचा विषय समोर आला आहे.’
Rupali Chakankar : 2024 साठी रुपाली चाकणकर खडवासल्यातून रिंगणात
पोलिसांनी तात्काळ दखल घेत 4 आरोपींना अटक केलीये अजून 1 आरोपी फरार आहे. तो ही लवकरच पकडला जाईल. असं ही यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या. तर पुढे त्या म्हणाल्या ‘हा विषय फक्त नाशिक पुरतां मर्यादित नाही. तर याचं पेव संपुर्ण राज्यात फुटलयं त्यामुळे या अनधिकृत प्रार्थनास्थळे व त्यात चालणारे अनधिकृत प्रकार याला उदध्वस्त करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केलीये
कुठलाही धर्म अनैतिक काम करण्यास शिकवत नाही. मला विश्वास आहे धर्मांच्या नावाखाली जबरदस्तीने सुरू असलेला हा नीचप्रकार शिंदे-फडणवीस सरकार नेस्तनाबूत करेल माझं दैव बलवत्तर म्हणून मी वाचले पण इतर कुठल्या महिलेचा बळी जाऊ नये असं म्हणत पिडीता तिच्या परीवारासोबत माध्यमांसमोर आली.