जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. मात्र, आयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये शिक्षण न घेता नाशिकच्य तरुणाने अॅमेझॉन कंपनीचं सव्वा कोटींचं पॅकेज मिळवलं आहे.
अनुराग माकडे याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. याच पदवीच्या जोरावर त्यानं ऍमेझॉनपर्यंत मजल मारली. बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या ऍमेझॉननं अनुरागला १.२५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती.
Assembly Session : ‘त्या’ विधानावर मी दिलगिरी व्यक्त करतो, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी
अनुराग माकडे हा नाशिकमधील रहिवासी असून याआधी त्यांनी बंगळूरुमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्न म्हणून नोकरी केली आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकन एक्सप्रेसमध्ये विश्लेषक म्हणूनही काम केलं आहे. अनुराग माकडे यांच्यासोबत इन्टिट्यूटच्या पाच विद्यार्थ्यांनाही एक कोटींपेक्षा अधिक पॅकेज मिळालं आहे.
माकडे यांनी LinkedIn वर आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल सांगितलं आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले, “नमस्कार मित्रांनो, मी Amazon मध्ये फ्रंटएंड इंजिनियर म्हणून सामील झाल्याचे सांगताना मला खूप आनंद होत आहे!”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
आता चित्रपट पायरसीला बसणार आळा; कठोर तरतुदी असलेलं सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक मंजुर
अनुराग नाशिकचा रहिवासी आहे. फ्रंट एंड इंजिनीअर म्हणून तो ऍमेझॉनमध्ये रुजू झाला आहे. अनुरागसोबतच्या आयआयआयटी अलाहाबादच्या आणखी काही विद्यार्थ्यांनीदेखील नेत्रदीपक यश मिळवलं आहे. आयआयआयटीचा विद्यार्थी प्रथम गुप्ताची गुगलनं निवड केली आहे. त्याला १.४ कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे.
तसेच उत्तराखंडच्या चंपावतच्या यशवंत चौधरीनं तर कमी वयात मोठी भरारी घेतली आहे. जर्मनीच्या टेस्ला गीगा कंपनीनं यशवंतला वरिष्ठ व्यवस्थापक पदावर काम करण्याची संधी दिली आहे. अवघ्या २४ वर्षांच्या यशवंतला २३ कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे.
कॅंम्पस प्लेसमध्ये एकूण 24 पदवीधर विद्यार्थ्यांना 50 लाखांपेक्षा जास्त वार्षिक पॅकेज मिळाले असून त्यापैकी 8 पदवीधरांना वार्षिक 52.89 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.