Assembly Session : ‘त्या’ विधानावर मी दिलगिरी व्यक्त करतो, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

Assembly Session : ‘त्या’ विधानावर मी दिलगिरी व्यक्त करतो, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

आदिवासी समाजाच्या लोकांच्या जमिनी गिळंकृत केल्याच्या मुद्दा उपस्थित करीत अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी रुद्रावतारच धारण केल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशामध्ये सुरु असलेल्या जमीनींच्या प्रश्नोत्तराच्या तासात आव्हाड यांनी आदिवासींच्या जमिनींचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना विरोधकांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यानंतर जितेंद्र आव्हडाांना आदिवासी समाजाच्या लोकांबद्दल बोलल्याच्या विधानावरुन जाहीरपणे माफी मागितली आहे.

IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर



नेमकं प्रकरण काय?

देवस्थान जमिनीची चौकशी महिन्याभरात करू असं आश्वासन गेल्या अधिवेशनात दिलं होतं. त्याचं काय झालं याचं उत्तर सरकारनं द्यावं”, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती. त्यावर काही तांत्रिक बाबी होत्या. मी जयंत पाटलांशी चौकशी करण्यासंदर्भातल्या अडचणींवर चर्चा करेन. चौकशीचे आदेश दिले आहेत. फक्त अहवाल येणं बाकी आहे. झालेल्या विलंबाबाबत मी क्षमा मागतो, असं मंत्री विखेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आदिवासी लोकांच्या जमीनी गिळंकृत होत असल्याचा आरोप करीत सडेतोडपणे भाष्य केलं.

सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं?, आमदार तनपुरेंची खोचक टीका…

आव्हाड म्हणाले :
आदिवासी जमिनींच्या विक्रीचा प्रकार घडतोय. बिचारे गरीब, अज्ञानी असतात. काहीतरी लिहून देतात. रात्रीचा त्यांचा कार्यक्रम झाला की ते शुद्धीतच नसतात. पण त्यामुळे त्यांची फसवणूक होते, ती अक्षम्य आहे. त्या जमिनींची किंमत हजार कोटींच्या घरात असते. त्यावर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? असं त्यांना विचारलं जातं. तो आदिवासी कुडाच्या झोपडीत राहातो. ती संपूर्ण जमीन त्याच्या ताब्यात. पण तहसीलदार त्याच्याकडे पुरावा मागतो. तो पुरावा आणायला गेला की ५-६ वर्षं लागतात. तोपर्यंत जमिनीवर कब्जा घेऊन प्लॅन पास होऊन खड्डे मारलेले असतात. बांधकाम उभं राहिलेलं असतं.

दरम्यान, “आदिवासी समाजाची माणसं रात्री शुद्धीत नसतात” या आव्हाडांच्या विधानावर सत्ताधाऱ्यांंनी तीव्र आक्षेप घेत “कृपया असे शब्द वापरू नयेत. कारण आदिवासी समाज सुसंस्कृत समाज आहे. अशा समाजाला बदनाम करणं चुकीचं आहे. हे रेकॉर्डवरून काढलं जावं”, अशी मागणी केली. त्यानंत बोलताना आव्हाडांनी “शब्द चुकीचा गेला असेल, तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं म्हणत या वादावर पडदा टाकला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube