IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर

  • Written By: Published:
IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. पहिल्या सामन्याआधी मोहम्मद सिराज वनडे मालिकेत खेळणार नसल्याची बातमी आली होती. तो भारतात परतला आहे. कामाच्या ताणामुळे सिराजला एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, आता खुद्द बीसीसीआयने सिराजला वनडे मालिकेतून वगळण्याचे कारण दिले आहे. (Why Mohammed Siraj Ruled Out From Odi Series Bcci Told Reason In Detail)

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद सिराजने पहिल्या वनडेपूर्वी घोट्याच्या दुखण्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या बदलीची घोषणा अद्याप झालेली नाही.

बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वघळण्यात आले आहे. सिराजला घोट्यात दुखत असून खबरदारी म्हणून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सिराज बाहेर झाल्यानंतरही संघाने त्याच्या बदलीची मागणी केलेली नाही.

सिराजच्या बाहेर पडल्यानंतर वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक-

पहिला एकदिवसीय सामना – 27 जुलै – केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस

दुसरा एकदिवसीय सामना – २9 जुलै – केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस

तिसरा एकदिवसीय सामना – 15 ऑगस्ट – ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube