Download App

नाशिक विधानपरिषद मतदारसंघात 5 हजार रुपयांचे पाकिटं जप्त, दोन जण ताब्यात

नाशिक विधानपरिषद मतदारसंघात 5 हजार रुपयांचे पाकिटं पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Image Credit: Letsupp

Nashik Teachers Constituency : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) आता विधानपरिषदेच्या चार मतदारसंघात निवडणूक होत आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency) उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशातच येवल्यामध्ये मतदारांना पैसे वाटप करताना पैसे वाटप करताना पोलिसांनी उमेदवार विवेक कोल्हे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे एकच खळबळ उडालीयं.

लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक; इंडिया आघाडीनेही दिला तगडा उमेदवार

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काही तासच उरले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवार विवेक कोल्हे यांचे समर्थक मतदारांना 5 हजार रुपयांचे पॉकेट वाटताना पोलिसांना आढळून आले. याप्रसंगी पोलिसही उपस्थित होते. पोलिसांनी उमेदवार विवेक कोल्हे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं असून येवला शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर कारवाई सुरु आहे.

18 व्या दिवशीही Munjya ची जादू कायम! बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच

मनमाडमध्येही पोलिसांची कारवाई..
राज्यात उद्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी पोलिसांसह तहसील विभागाकडून पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनमाडमधील गणेश नगर भागात पोलिसांनी छापा मारुन पैसे असलेली पाकीटे जप्त केली आहे. या पाकिटांमध्ये विवेक कोल्हे यांचे पॉम्प्लेट आढळून आले असून दोन जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे किशोर दराडे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून संदीप गुळवे हे रिंगणात उतरले आहेत, तर विवेक कोल्हे अपक्ष मैदानात उतरले आहेत.

follow us

वेब स्टोरीज