New railway line connecting Ahilyanagar Rahuri to Shanishinganapur: अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) राहुरी ते देवस्थान शनिशिंगणापूरला (Shanishinganapur) रेल्वे धावणार आहे. धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, निधीही मंजूर केलाय.
मंत्रिपद मिळून चार दिवस होत नाही तोच भुजबळांची राजीनाम्याची भाषा; थेट घेतलं मुंडेचं नाव
हा मार्ग 21.84 किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी 495 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूरला दिवसाला 30 हजार ते 45 हजार भाविक ये-जा करतात. शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला आल्यानंतर भाविक हे शनिशिंगणापूरला येतात. शिर्डीपर्यंत रेल्वेची सुविधा आहे. परंतु शनिशिंगणापूरला येण्यासाठी भाविकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. त्यामुळे या भागात रेल्वे सुरू करण्याची जुनी मागणी होती.
अजितदादांनी ठणकावल्यानंतर आयजी सुपेकर आले समोर; सर्व आरोप फेटाळत दिला इशारा
या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही फायदा होईल. ज्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) दररोज चार प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव आहे. ज्यामध्ये अंदाजे वार्षिक प्रवासी संख्या 18 लाख असणार आहे.
जिल्हा प्रवासी संघटनेकडून रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा
या निर्णयाचे अहिल्यानगर जिल्हा प्रवासी संघटनेचे स्वागत केले आहे. या मार्गासाठी प्रवासी संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. या संदर्भात शनि शिंगणापूर येथील भेटीदरम्यान रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना निवेदनही देण्यात आले होते. या प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असे हरजीतसिंह वधवा यांनी सांगितले.