Download App

Video : विखे आमच्या जिल्ह्याचे नेते मी अभिमानाने सांगतो; लंकेंकडून विखेंच्या कौतुकांचे गोडवे

निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही. विखे परिवार हा जिल्ह्यात मोठा परिवार आहे. निवडणूक म्हणून मी त्यांच्या विरोधात बोललो. एक उमेदवार म्हणून हे योग्य आहे. सहकार क्षेत्रामध्ये विखे यांचे खूप मोठे योगदान आहे. निवडणूक होती झालं गेलं सोडून द्यायचं अशा शब्दात खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विखे यांच्यावरती भाष्य केलं. तसेच विखे आमच्या जिल्ह्याचे नेते मी अभिमानाने सांगतो असेही गोडवेही लंकेनी गायले आहेत. महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सत्कार सोहळा केडगाव येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. (Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil And Vikhe Family)

विधानसभेला 100 जागा घ्या नाहीतर, चर्चेसाठी मला मोदी-शाहंकडे न्या : रामदास कदम

काय म्हणाले लंके?

लंके म्हणाले की, खासदार झालो मात्र अद्यापही सत्कार सुरू आहेत. माझं लग्न झालं मात्र माझी हळद फिटली नाही. एकदा विजयाची गर्दी कमी झाली की त्यानंतर मी अंदाज घेतो. सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सध्या आढावा बैठकी घेता येणार नाही. मात्र आचारसंहिता संपली की आढावा बैठकींचा धडाका सुरू करणार आहे. लोकांचे कोणते प्रश्न प्रलंबित आहे यावरती चर्चा करून त्यातून मार्ग काढणार असल्याचा शब्दही लंकेंनी दिला आहे. नगरमध्ये समस्यांचा भडीमार आहे मात्र तो सोडवण्यासाठी मी प्रत्येक प्रभागात फिरणार आहे. निवडणुकांमध्ये काय झालं कोणी काय टीका टिपणी केली? कोणी माती खाल्ली, कोणी गुलाबजाम खाल्ला याचं मला काही घेणं देणं नाही असे म्हणत आता विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करणं गरजेचे आहे असे लंके म्हणाले.

सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी

मी अभिमानाने सांगतो विखे आमच्या जिल्ह्याचे नेते

मी निवडणुकीमध्ये ज्या खासदारांविरोधात लढलो त्यांच्यावर मी टीका टिपप्णी केली. मात्र निवडणूक झाली गेली तिथं सोडून द्यायचं. उमेदवार म्हणून मी त्यांच्यावरती टीका टीपणी केली हे योग्य आहे. मात्र विखे परिवार हे जिल्ह्यातले एक मोठं नाव आहे. सहकार क्षेत्रात विखे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून मी अभिमानाने सांगतो की, आशिया खंडातला पहिला साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केला याचा मला अभिमान आहे. एवढेच नव्हे तर, राज्याचे दुग्धविकास मंत्री हे माझ्या जिल्ह्याचे आहे हे मी अभिमानाने सांगतो. कुणी विरोधक आहे म्हणून कायमच त्यांच्या विरोधात बोलणे योग्य नाही असेही लंकेंनी विखे परिवाराचे गोडवे गाताना म्हटले. राजकारण हे जिरवा जिरवीसाठी नसतं तर, या राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य झालं पाहिजे लोकांची कामे झाली पाहिजे.

follow us