Download App

दिल्ली अब दूर नही…! निलेश लंकेंनी फुंकले नगर दक्षिण लोकसभेचे रणशिंग…

Nilesh Lanke On Sujay Vikhe : लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे. आता तस तसे इच्छुक उमेदवारांची नावे देखील चर्चेत व समोर येऊ लागली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) यंदा चांगलीच रंगतदार होणार असे दिसते. यातच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. यातच निलेश लंके यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या शुभेच्छा फलकावरच ‘अब दिल्ली दूर नही’ असा संदेश लिहिला आहे. एकप्रकारे ही लोकसभेची तयारी असल्याचे यामाध्यमातून स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र नेमका उमेदवार कोण असणार कारण राणी लंके (Rani Lanke) यांनी देखील आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे वेळोवेळी जाहीर केले. मात्र आमदार निलेश लंके यांचे नाव आता लोकसभेसाठी जोर धरू लागले आहे.

राज्यात येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुका या पार पडणार आहे. यामुळे आता लोकसभेच्या अनुषंगाने राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. यातच नगर दक्षिणमधून लंके हे देखील लोकसभेसाठी तयारी करत आहे. नुकतेच नगर शहरात खासदार अमोल कोल्हे यांचे प्रमुख भूमिका असलेले संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या महानाट्याचे लंके यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नगर दक्षिण मतदार संघ पिंजून काढत त्यांनी मोठा जनसमुदाय जमावाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी या महानाट्याला प्रतिसाद दिला. यामाध्यमातून एकप्रकारे लंके यांनी लोकसभेसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

कीर्तीकरांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत ‘मिठाचा खडा’, संजय निरुपम यांची ठाकरेंवर टीका

कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कामाची माहिती यामाध्यमातून देण्यात आली. एकप्रकारे लोकसभेची मतपेरणी महानाट्याच्या माध्यमातून लंके यांच्याकडून करण्यात आली आहे. यातच भर मंचावर शरद पवार गटाचे खासदार असलेले अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना नगर दक्षिणेची तुतारी फुंकण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान लंके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा लढवणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे. मात्र अद्याप लंके यांनी आपली याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली नाही.

‘…तर मी तुमच्यासोबत नसेल’, भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार का?

‘दिल्ली अब दूर नही’
राष्ट्रवादीचे अजित पवार गटात असलेले निलेश लंके यांचा आज वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी देखील उत्साहात भावी खासदार म्हणून लंके यांचा उल्लेख केला आहे. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर अब दिल्ली दूर नही असे सूचक विधान देखील करण्यात आले आहे. यामुळे लंके यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ठ संकेतच यामाध्यातून देण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात नगर दक्षिणमध्ये लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होणार यात शंका नाही.

राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांदरम्यान आढळराव-मोहितेंचं मनोमिलन; शिरूरमध्ये आढळरावांचा मार्ग मोकळा?

follow us