भाजप ज्यात बसलाय तो कचऱ्याचा डंपर आम्ही गुजरातमध्ये नेऊन टाकणार; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, भाजप ज्या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसलाय तो आम्ही गुजरातमध्ये नेऊन टाकणार. तर फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होत की, शिंदेंनी त्यांच डंपर पलटी केलं आहे.
अडल्ट फिल्मस्टार Sophia Leone ने वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अपार्टमेंटमध्ये आढळलं शव
त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, कोणाचा डंपर पलटी होतोय आणि कोणाचा झंपर वर जातोय? हे कळेल आता. लोकांनी तुकारामांची अभंग गाथा वाचावी. डुक्कर कितीही चिखलात लोळला आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता का? तर तो म्हणेल चिखलच माझा स्वर्ग आहे. ही डुकराची नीती भाजप पक्षाची आहे. हे चिखलात लोळत आहेत. आमच्याबरोबर असताना हे स्वर्गात होते, स्वर्ग सुखात आनंद घेत होते. आज त्यांच्या बाजूला दोन डबकी आहेत, ही डुकरे त्या डबक्यात लोळत आहेत.
अजितदादा सीएम होऊ नये म्हणून माणसं कामाला; शेळकेंचे पवारांवर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ज्याप्रकारे तुफान निर्माण केल आहे, त्या तुफानाची यांना भीती वाटत आहे. उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न या फडणवीस सरकारने केला पण काही फायदा झाला नाही. ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये हे बसले आहेत, जो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे. या कचऱ्याच्या डंपर मध्ये बसून भाजप पक्षाचा प्रवास जर सुरू असेल, तर महाराष्ट्र हा डंपिंग ग्राउंड नाही तर सगळा कचरा या डंपरसह महाराष्ट्राच्या सीमापार गुजरात मध्ये जाऊन आम्ही टाकणार आहोत.
जागावाटपाचं घोंगड भिजत तरी युती-आघाडीचे मुंबईतील उमेदवार जाहीर, यांना मिळणार संधी!
आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका, चाकू सूरेवाले आम्ही लोक आहोत. ही शिवसेना चाकू सूऱ्यातून वाढलेली आहे. म्हणून आम्हाला शिकवू नका कट्याराची गोष्टी. आधी तुमची जागावाटप नीट करा. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात भाजप पक्ष आणि त्यांचे दोन डंपर त्यांच्या हातून निसटतायत. यामुळे महाराष्ट्रातून जाऊन लोकांनी मोदींना विनंती केली आहे की, तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा आणि मोदी ती ऑफर स्वीकारत आहेत. मोदी महाराष्ट्रातून लढले तर यांना चार-पाच जागा मिळतील. गडकरींचे तिकीट कापून नागपुरातून लढावं असं मोदींच्या डोक्यात आहे. आम्ही सर्व मिळून 40 च्या वर जागा जिंकणार आहोत आणि ते जर रोखायचं असेल, तर मोदींनी महाराष्ट्रातून नागपूर किंवा पुण्यातून निवडणूक लढावी. ही त्यांची भीती आहे.
तर फडणवीस उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले होते की, या नाट्यगृहात तुम्ही चांगली नाटकं पहाच. पण सध्या नाट्यगृहा बाहेर खूपच नाटक सुरू आहेत. वेगवेगळ्या स्क्रिप्ट बनवल्या जात आहेत. खोटेनाटे आरोप होताहेत. कितीही नाट्य रंगवली तरी नटसम्राट होता येत नाही. कारण कट्यार काळजात घुसलेली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे डंपर पलटी केलेला आहे. असे शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.