‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात डॉक्टर अडकला; सव्वा सात कोटींचा गंडा कसा घातला ?

Digital Arrest: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील एक ज्येष्ठ डॉक्टरच डिजिटल अरेस्टचा शिकार झालाय.

octor caught in the net of 'digital arrest'; How did he embezzle Rs. 7.5 crore

octor caught in the net of 'digital arrest'; How did he embezzle Rs. 7.5 crore

Digital Arrest: सायबर गुन्हेगारांनी अनेकांचे बँक खाते रिकामे केलेत. ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमांतून तर कोट्यवधी रुपये उकळले जातायत. शिक्षक, वकील, उच्च शिक्षित असे कुणीच यातून सुटलं नाही हे आपण अनेकदा बातम्यांमध्ये वाचलंय. डिजिटल अरेस्टबाबत (Digital Arrest) पोलिसांकडून जनजागृती केली जातेय. तरीही लोक यात अडकतायत. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील एक ज्येष्ठ डॉक्टरच डिजिटल अरेस्टचा शिकार झालाय. या डॉक्टरांची फसवणूक थोडीथिडकी नाही, तर तब्बल कोटी 17 लाखांची झालीय. हे डॉक्टर डिजिटल अरेस्टमध्ये कसे अडकलेत हेच जाणून घेऊया…

सात सप्टेंबरला श्रीरामपूरमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांना एक कॉल येतो. समोरची व्यक्ती मी प्रिया शर्मा असून, ट्रायमध्ये बोलत असल्याचे सांगते. या कॉलच्या दरम्यान डॉक्टरांना एक नंबर पाठवून हा तुमचा मोबाइल नंबर आहे याची चौकशी केली जाते. डॉक्टरांकडून मोबाइल नंबर आपला नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ही महिला तुमच्याविरुद्ध बेकायदेशीर जाहिराती करणे, पोनोग्राफी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. हा माझा नंबर नसल्याचे डॉक्टर सांगतात. त्यानंतर ही महिला डॉक्टरांना पोलिस अधिकारी देविलाल सिंग यांच्याशी बोलण्यास सांगते. देविलाल सिंग डॉक्टरांची बाजू एेकून घेतात. त्यानंतर देविलाल सिंग पुन्हा डॉक्टरांना कॉल करतो. तुमचा नरेश गोयल, जेट एअरवेज मनी लॉंड्रिंगप्रकरणी प्रकरणी संबंध आहे. तुमची आयडेन्टीटी या प्रकरणात वापरलीय, असे सांगितले जाते. त्यामुळे डॉक्टर घाबरून जातात. आपला या प्रकरणात काहीही संबंध नाही, असे सांगतात. (Doctor caught in the net of ‘digital arrest’; How did he embezzle Rs. 7.5 crore)

त्यानंतर देविलाल सिंग हा डॉक्टरांना तुमची केस ऑनलाइन चालवावी लागेल, असे सांगतो. दोन तीन दिवसांनी अनेक मोबाइल नंबरवरून व्हॉटसअप चॅटिंग केले जाते. व्हिडिओ कॉल केला जातो. पोलिस अटक वॉरंट पाठविले जाते. व्हिडिओ कॉलवरच कोर्ट हॉल, जज, क्लार्क, पोलिस अधिकारी दाखविले जातात. तुम्हाला अटक केली जाणार नाही केवळ नजरकैदेत राहायला सांगितले जाते. त्यानंतर बँक खाते, मालमत्तेचे कागदपत्रे व्हॉटसअपद्वारे मागून घेतली जातात. त्यानंतर तुम्ही यासाठी रक्कम पाठवा, पोलिस क्लिअरन्स झाल्यानंतर ही रक्कम पुन्हा तुम्हाला दिली जाईल, असे सांगितले. त्यानंतर एका बँकेतून 56 लाख रुपये पाठविले. त्याचवेळी त्यांची पत्नी ही परदेशातून घरी आली. त्यावेळी व्हिडिओ कॉल सुरू होता. त्यावेळी तुमची पत्नी यात सहआरोपी असल्याचे सांगितले. त्यांची ऑनलाइन कोर्टासमोर हजेरी घेण्यात येईल, असे सांगितले. डॉक्टरांकडून एफडीचे कागदपत्र, शेअर्सची माहिती मागितली जाते. त्यानंतर डॉक्टरांच्या तिन्ही मुलांना अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर डॉक्टरांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकून 4 कोटी रुपये जमा केले. ते पैसे आरोपींच्यावर खात्यावर आरटीजीएसने वर्ग करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एका 2 कोटी 58 लाख रुपये मागितले जातात. डॉक्टरांनी तब्बल 7 कोटी रुपये आरोपींच्या खात्यावर वर्ग केली. त्यानंतर डॉक्टरांना संशय आला, त्यानंतर त्यांनी अहिल्यानगरच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे. असा फसविण्यारा फोन, व्हिडिओ कॉल तुम्हाला आला तर सावध राहा आणि पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन लेट्सअप तुम्हाला करतंय.

Exit mobile version