Download App

विखेंची एक भेट अन् दोनच दिवसांत थेट निर्णय; कांदा निर्यात सुरु

Image Credit: letsupp

Radhakrushna Vikhe Patil News : देशात केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी कांदा प्रश्नी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेत वस्तुस्थिती सांगितली होती. या भेटीच्या दोन दिवसांतच केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली असून 3 लाख मेट्रीक टन कांद्याच्या निर्यातील मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कन्फर्म! आर. अश्विन पुन्हा संघात परतणार; ‘बीसीसीआय’नेच केलं शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ३१ मार्च २०२४ अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे समितीने 3 लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. यासोबतच बांग्लादेशातही 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण; कायद्याचा मसुदा तयार : निवडणुकीपूर्वी CM शिंदे मोठा डाव जिंकणार?

मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुन्हा विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहांची भेट घेतली. ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी होती. कांद्यासंदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा यांच्यासमोर मांडण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यात नगर, नाशिक, पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो, अशात निर्यात बंदीचा फटका शेतकर्यांना बसत आहे, त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी विखे पिता-पुत्रांनी केली होती.

youtube.com/watch?v=SZWfkFrAIUo

दरम्यान, केंद्र सरकारने आज कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेतील मंत्र्यांच्या समितीन कांदा निर्यातीला मान्यता दिली
आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

follow us

वेब स्टोरीज