निळवंडे कालव्याच्या 3.7 किलोमीटर पूरचारी डिझाईन व अंदाजपत्रकाच्या कामाचा कार्यारंभ आदेश-आ.आशुतोष काळे

Ashutosh Kale: जलसंपदा विभागाकडून 3.7 किलोमीटरच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच डिझाईन व अंदाजपत्रक बनण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश.

Ashutosh Kale

Ashutosh Kale

कोपरगाव: निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचविण्यासाठी वेळोवेळी पदरमोड करून खर्च केल्यामुळे प्रत्येक गावाला चाऱ्या नसतांना देखील पाणी पोहोचविले. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात यासाठी पूरचारीच्या सर्वेक्षण कामाची वर्क ऑर्डर लवकरात लवकर प्रसिद्ध होवून प्रत्यक्षात कामाला देखील तातडीने सुरुवात व्हावी या उद्देशातून करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. रांजणगाव देशमुख, अंजनापूर व बहादरपूर येथील अंजनापूर पाझर तलाव क्रमांक ३ ते मंगलमूर्ती कार्यालयापर्यंत 1.2 किलोमीटर निळवंडे कालवा टेल ते खोकडविहीर 2.5 किलोमीटर अशा एकूण 3.7 किलोमीटरच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) (Nilwande Canal) डिझाईन व अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे राहिलेले पाझर तलाव भरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली. ( Order to commence work on the design and budget of 3.7 km pipline of Nilwande Canal- Ashutosh Kale)

विकेंड पार्टींच्या नशेतले राक्षस अजून किती जीव घेणार? सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांचा प्रश्न

निळवंडे कालव्यांच्या कामांना गती देण्यासाठी माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील विरोधी पक्षाचा आमदार असताना त्यांच्या कार्यकाळात निळवंडेच्या कामाला गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या कामाला गती देणार असल्याचा शब्द निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव,अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर आदी गावातील नागरिकांना दिला होता.

सर्वात मोठी बातमी, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी 21 डिसेंबरला

त्याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच असतो. त्या पाठपुराव्याची माहिती देतांना त्यांनी नोव्हेंबर महिन्यात ऊर्ध्व प्रवरा निळवंडे-2 प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक चारचे 36.33 कोटी व टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे 36.62 कोटी असे एकूण 72.65 कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा भूमिपूजन भूमिपूजन कार्यक्रमात लवकरच बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक बनण्याच्या कामास कार्यारंभ आदेश प्रसिद्ध होणार असल्याची माहिती निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांना दिली होती. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाकडून 3.7 किलोमीटरच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक बनण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पाठपुराव्याची दखल घेवून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक बनण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्रसिद्ध करण्यात आल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

कोपरगाव मतदारसंघाच्या जिरायती भागातील विविध गावांमध्ये पिण्याच्या व शेती सिंचनाचा प्रश्न अतिशय बिकट होता. या जिरायती गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. तेथील पिण्याच्या पाण्याची पाहून सिंचनासाठीची परिस्थिती कशी असू शकते याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. मात्र ही परिस्थिती आमदार आशुतोष काळेंच्या भगीरथ प्रयत्नातून निळवंडे कालव्याचे पाणी संपूर्ण लाभक्षेत्रात फिरल्यामुळे बदलली आहे. या निळवंडेच्या पाण्यापासून अंजनापूर आणि बहादारपूरचा पश्चिमेचा भाग वंचित राहत होते. त्यामुळे उजनी चारी योजना चालवावी लागत होती. तसेच धोंडेवाडी, जवळके, बहादाराबाद व शहापूर हा भागही वंचित राहणार होता. त्यासाठी रांजणगाव देशमुख, अंजनापूर व बहादरपूर येथील अंजनापुर पाझर तलाव क्रमांक तीन ते मंगलमूर्ती कार्यालयापर्यंत 1.2 किलोमीटर व निळवंडे कालवा टेल ते खोकडविहीर 2.5 किलोमीटर अशा एकूण 3.7 किलोमीटरच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून गती मिळाली त्यामुळेच या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त होवून निळवंडे कालव्यातून रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी,जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलावांमध्ये बंदिस्त पाईपलाईनने (पूरचारी) पाणी आणण्याचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी सांगितले.

निळवंडे कालव्याचे पाणी संपूर्ण लाभक्षेत्रात फिरवण्यासाठी अनंत अडचणी असतानाही आमदार आशुतोष काळे यांनी किती आणि कसा पाठपुरावा केला आहे हे निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील नागरिकांनी जवळून अनुभवले आहे. परंतु ज्यांचे याकामात कोणत्याही प्रकारचे काडीचेही योगदान नाही त्या व्यक्ती श्रेय लाटण्याचा वारंवार प्रयत्न करतात. ज्यावेळेस निविदा प्रसिद्ध झाली त्यावेळीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला गेला आताही कार्यारंभ आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर काही व्यक्ती श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील. परंतु फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी केलेला पत्रव्यवहार आणि कागदपत्रांची गरज भासल्यास आम्ही ते उपलब्ध करून देऊ, असे अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version