Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Pm Narendra Modi) मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच पर्यायाने मी कांद्यावर बोलण्याची घोषणा दिली असल्याचं किरण सानप (Kiran Sanap) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदी बोलत असतानाच किरण सानप यांनी ‘कांद्यावर बोला’ अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं होतं.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘मडगाव एक्स्प्रेस’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? वाचा…
मोदींच्या सभेत घोषणा देणारा शेतकरी कुटुंबातील तरुण असून तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं होतं. त्यानूसार किरण सानप यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले शरद पवार यांनी भेट घेतली असून निफाड तालुका हा कांद्याची पंढरी म्हणून ओळख आहे. मागील महिन्यात कांदा विषय राज्यात चांगलाच गाजला होता. त्यानंतर पंतप्रधान निफाडमध्ये आल्यानंतर त्यांनी कांदा विषयावर बोलणं अपेक्षित होतं, मी त्यांनी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोलले नाहीत त्यामुळे पर्यायाने मला कांद्यावर बोलण्याबाबतच्या घोषणा द्याव्या लागल्या होत्या, असं किरण सानप यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’, मराठीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांत नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसण्यात येत आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मोदींनी नाशिकात सभा घेतली होती. याच सभेत मोदींचं भाषण सुरु असताना किरण सानप यांनी घोषणाबाजी केली होती. महायुतीच्या हिंदुत्त्ववादी राजकारणाच्या अजेंडाच्यादृष्टीने नाशिक लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी नाशिकमध्ये सभा घेतली होती.
https://x.com/LetsUppMarathi/status/1791363113473749259
मोदींचे भाषण सुरु असताना समोर बसलेल्या गर्दीतून किरण सानप याने ‘कांद्यावर बोला’ असे जोरदार आवाजात सांगितले. किरण सानपच्या आवाजामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. या गोंधळात मोदींनी अगदी थोड्यावेळासाठी भाषण थांबवलेही होते. पोलिसांनी किरण सानपला पकडून बाहेर नेल्यानंतर मोदींनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझा फोन जप्त करून चौकशी केली. मला रात्री उशिरा मला सोडण्यात आले. विरोधक माझ्यावर टीका करतात, कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मी सभेत मी कुठेही शरद पवार यांच्या घोषणा दिल्या नाहीत. 2019 पासून मी राष्ट्रवादीत काम करतो. मी केवळ एक शेतकरी म्हणून सभेला गेलो होतो. पवार साहेबांनी काल अभिमान असल्याचे सांगितले, त्यामुळे माझा ऊर भरून आल्याची भावना किरण सानपने बोलून दाखवली.