PM Modi : आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पंतप्रधान मोदी हे उद्या 12 जानेवारीला 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये तपोवन येथील मैदानावर होणार आहे.
Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र येणं टाळणार?
यावेळी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर हेलिपॅडपासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत असा पंतप्रधान मोदींचा रोड शो देखील होणार आहे. त्यामध्ये दीड ते दोन लाख युवकांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमाचे पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची परवानगी पण…
पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे रूप मात्र तर मोदींच्या दौऱ्या अगोदर शहराची स्वच्छता त्याचबरोबर रंगरंगोटी देखील केली जात आहे. त्याचबरोबर रस्त्यांचं डांबरीकरण डाग डूजी देखील केली जात आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वीज समित्या गठित करण्यात आल्या असून 75 शासकीय अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
Sunil Kedar यांना सुटकेचा जल्लोष भोवला; केदार यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल
तसेच शहराच्या रंगरंगोटीमध्ये 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाची देखील झलक पाहायला मिळणार आहे. कारण पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार असलेल्या रोडवर श्री रामांच्या आयुष्यातील नाशिकमध्ये घडलेल्या प्रसंगांची चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामध्ये शुर्पनखा वध, मारिच वध यांसह सीताहरण यासांरखे प्रसंग असतील. मोदी या नाशिक दौऱ्यामध्ये गोदा काठावर गोदेची आरती करणार आहेत. तसेच ते काळाराम मंदिराला भेट देणार आहेत.