Pm Modi in Ayodhya : अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत; पाहा फोटो

Pm Modi in Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (30 डिसेंबर) ला अयोध्येच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

पंतप्रधान मोदींनी अयोध्येत 8 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. यानंतर अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

त्यावेळी मोदींना येथील जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले की, आज मला अयोध्येच्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाचं सौभाग्य मिळालं आहे. मला या गोष्टीचं आनंद आहे की, येथील विमानतळाचं नाव महर्षि वाल्मिकी यांच्या नावावरुन ठेवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचल्यानंतर विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधानांचा रोड शो झाला. यावेळी नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी होती.
