Radhakrishn Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) हे तलाठी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधल्यामुळे आक्रमक झाले आहेत. विखे म्हणाले की, स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळ निघालं व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब तुम्ही द्यायला हवा. हे सगळं आता ‘ईडी’ कारवाईने समोर येईलच. तसेच सरकारवर बेछूट व निराधार आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. सरकारची व महसूल विभागाची बदनामी केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
PM Modi यांचं नाशिकमध्ये आगमन; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून स्वागत, पाहा फोटो
आमदार रोहित पवार यांनी भरतीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला होता. तसेच आपल्यावर कारवाई करावीच, असे खुले आव्हान देखील त्यांनी प्रशासनाला दिले होते. दरम्यान रोहित पवारांचे आव्हान विखे पाटील यांनी स्वीकारले आहे. कारवाईच्या इशाराचा पुनरुच्चार करताना विखे पाटील म्हणाले, की तलाठी भरतीमध्ये 30 लाख रुपये घेतल्याचे बेछूट आरोप त्यांनी केला आहे. सरकारची व संबंधित विभागाची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई निश्चित केली जाणार आहे.
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा, 2024 मध्ये आम्ही.. राऊतांचा हल्लाबोल
तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, की तलाठी ‘भरतीमध्ये कोठेही गोंधळ हा झालेला नाही तसेच कोणतंही विसंवाद नाही आहे. अत्यंत पारदर्शी पद्धतीने निकाल जाहीर झाला आहे. गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी विनाकारण मुलांमध्ये बुद्धीभेद करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
रोहित पवार काय म्हणाले होते?
“तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीप्रकरणी गुन्हा दाखल झाला, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 30 लाखाहून अधिकची वसुली करण्यात आली . सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी याचे सत्वांचे साटेलोटे असून कोट्यवधींचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचं पाप या सरकारने केलं आहे,” अशी टीका रोहित पवारांनी केली होती.
परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढा…विखे म्हणाले आम्ही तयार…
राज्यात घेण्यात आलेल्या तलाठी, वनरक्षक पदाच्या तसेच पोलीस भरतीच्या परीक्षेत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारने या परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाष्य केले आहे. विखे म्हणाले, की या परीक्षेबाबत श्वेतपत्रिका काढायला आम्हाला काहीच अडचण नाही व भीतीही नाही; पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो सावळा गोंधळ सुरू होता, कोविड काळातील असेल किंवा लावसाबाबतचा असेल. या भ्रष्टाचारवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु असल्याचे यावेळी मंत्री विखे म्हणाले.