अहिल्यानगर : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात (Swargate Bus Stand) लैंगिक अत्याचारीच घटना घडल्यानंतर मंत्री आता आपापल्या जिल्ह्यातील बसस्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. अशातच आता जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या (ST Corporation)al अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्वाचे निर्देश दिले. महामार्गावरील खाजगी हॉटेल्स आणि ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा, ढाब्यांसाठी नियमावली लागू करा, सर्व बसस्थानकांत सीसीटीव्ही बसवा, असे निर्देश विखेंनी दिले.
निवडणुकीनंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये, माजी आमदारासह 5 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
तसेच एसटी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकांचे फलक लावा, जिल्ह्यातील सर्व डेपोंची पाहणी करा, असा सूचना विखे यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राधाकृष्ण विखे यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, ज्येष्ठ भाजप नेते विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि नितीन दिनकर उपस्थित होते.
यावेळी विखेंनी म्हणाले की, लांब पल्ल्याच्या एसटी बस महामार्गावरील खाजगी ढाबे, हॉटेल्सवर थांबतात. त्यांच्यासाठी नियमावली तयार करा. तसेच ढाबा चालक नियमांचे पालन करत आहेत की नाही याची तपासणी करा. तेथील स्वच्छतागृह, सुरक्षेचे वातावरण प्रवाशांसाठी योग्य आहे की, नाही याची पाहणी करा. अन्यथा ढाब्यावर थांबण्याची वरिष्ठांनी मंजुरी दिली की चालकांना मोफत जेवणाची ‘पॅकेज’ मिळतात पण प्रवाशांना काय मिळते, तेही पाहा, असं स्पष्ट निर्देश विखेंनी दिले.
जिल्ह्यातील डेपोंची तपासणी करा, तेथील बंद गाड्या तपासणीची मोहित घ्या, सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस ठाण्याशी जोडा, सौर प्रकल्प उभारून बसस्थानकात दिव्यांची व्यवस्था करा, अशाही सुचना विखेंनी दिल्या.
पुढं ते म्हणाले, राज्य सरकारच्या निधीतून जिल्ह्यातील बसस्थानक उभारण्याऐवजी, त्यावर अवलंबून राहण्याऐवजी ‘बीओटी’ची प्रकल्प तयार करा. त्या माध्यमातून एसटी महामंडळाचे उत्पन्नही वाढेल. जिल्ह्यात सध्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे. आम्ही अतिक्रमणे हटवतो, मात्र, बसस्थानकाभोवतीच्या अतिक्रमणांकडेही महामंडळाने लक्ष द्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुढील महिन्यात मुंबईत पुन्हा बैठक आयोजित केली जाईल, असं विखेंनी स्पष्ट केलं.