महादेव मुंडे हत्या प्रकरण : ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर तपासा, सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

Supriya Sule Letter Devendra Fadnavis : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येवरून राज्यातील वातावरण तापलंय. अशातच सव्वा वर्षापूर्वी झालेलं महादेव मुंडे (Mahadev Munde) हत्या प्रकरणही समोर आलं. मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळलाय. दरम्यान, याप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्याची मागणी मुंडे कुटुंबियांनी केली. अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) मुंडे कुटुंबीयांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे.
‘दम लगाके हईशा’च्या प्रदर्शना आधी मी अनेक रात्री जागाच होतो! आयुष्मानने दिला आठवणींना उजाळा
महादेव मुंडेंच्या हत्येला एक वर्ष झाले तरीही त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नाही, त्यामुळे गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, असं सुळे म्हणाल्या. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोनचे सीडीआर तपासावे, तसचे महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी जेव्हा गजाआड होतील, तेव्हा त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
परळी शहरातील ‘महादेव मुंडे खूनप्रकरणा’चा तपास गेली काही महिन्यांपासून रेंगाळला आहे.बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मी मुंडे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी या प्रकरणातील आरोपी अद्यापही तपासयंत्रणांना सापडले नाहीत. यासंदर्भात परळी पोलीस ठाण्यात कार्यरत… pic.twitter.com/tsQUn34iQj
— Supriya Sule (@supriya_sule) February 27, 2025
सुप्रिया सुळेंनी एक्स अकाऊंटवर हे पत्र शेअर केलं. या पत्रात सुळेंनी लिहिलं की, बीड जिल्ह्यातील परळीचे रहिवाशी महादेव मुंडे यांचे २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेला तब्बल एक वर्ष उलटून गेले तरीही त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असून तपासात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
उतेकरांनी माफी मागितलीच नाही, ‘त्या’ व्हायरल क्लिपवर शिर्के स्पष्टच बोलले…
पुढं सुळेंनी म्हटलं की, नुकतेच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मी स्व. महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता मुंडे कुटुंबीयांनी आपले म्हणणे मांडले. या कुटुंबाला शासनाकडून न्याय हवा आहे. त्यांनी ‘महादेव मुंडे खून प्रकरणा’ चा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली असून हा तपास सीआयडीकडे सोपवावा असं त्यांचे म्हणणे आहे. याखेरीज परळी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सानप, भास्कर केंद्रे, गोविंद भताने आणि विष्णू फड या कर्मचाऱ्यांच्या फोनचे दि. २१ ऑक्टोबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ दरम्यानचे सीडीआर काढले तर या प्रकरणाचा तपास थांबविण्यासाठी कोणत्या बंगल्यावरुन फोन आला. हे प्रकरण दाबण्यासाठी कोणी कोणी फोन केले तसेच खून कोणी केला. यातील आरोपी कोण आणि त्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण हे निष्पन्न होईल असे मुंडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या पद्धतीने कार्यवाही झाल्यास या प्रकरणातील आरोपींना गजाआड करणे शक्य होईल. जेंव्हा हे आरोपी गजाआड होतील तेंव्हा त्यांची नार्को टेस्ट करावी अशीही मुंडे कुटुंबियाची मागणी आहे.
दरम्यान, एवढा प्रदीर्घ काळ रखडलेल्या या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंडे कुटुंबियांनी केलेली ही मागणी योग्य आहे अशी आमची भूमिका आहे. या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून कोणावरही अन्याय होणार नाही याची शाश्वती देण्यासाठी राज्याचे प्रमुख आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून आपण नक्की पुढे याल अशी आम्हाला आशा आहे, असं सुळे म्हणाल्या.