Download App

‘मी’ म्हणजे मराठा समाज, हे डोक्यातून काढा; मंत्री विखेंनी जरांगेंना सुनावलं

Ahmednagar : मनोज जरांगे (Manoj Jarange)यांना मराठा समाजाने फार मोठे आदराचे स्थान दिले होते. मला मनोज जरांगेंना सांगायचं की, मी म्हणजे मराठा समाज आहे, हे त्यांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणं बंद केलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis)यांच्याबद्दल जी बेताल वक्तव्य केली ती कोणत्याही शिष्टाचाराला धरुन नसल्याची घणाघाती टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी केली आहे. त्यांनी अहमदनगरमध्ये Ahmednagar माध्यमांशी (media)संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

निवडणुकीआधी अखिलेश यादवांना धक्का! ‘त्या’ प्रकरणात CBI ने बजावली नोटीस

मंत्री विखे पाटील म्हणाले की, सरकारने दोन्ही सभागृहात आरक्षणाचे जीआर काढले. ते तुम्हाला मान्य नाही म्हणजे समाजाला मान्य नाही असं नाही. तुम्ही म्हणजे समाज नाही. आंदोलनाकरिता समाजाने पाठबळ दिले, त्यावर तुम्हाला स्वतःचं काही साद्ध करायचं आहे का? समाज एवढा भोळा नाही. या बाबतीत समाजात जागृती करायचे काम देखील आम्ही हाती घेऊ, असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

फडणवीसांनी ‘मराठा’ समाजासाठी काय केले? जरांगेंच्या आरोपांनंतर भाजपने समोर आणली ‘कामांची’ यादी

एसआयटी चौकशीची मागणी योग्यच…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चोकशीची मागणी करणं योग्यच होती. मी कालच सभागृहात म्हटलो, तुम्ही तुतारी वाजवता की हातात मशाल घेता? ज्या दिवशी दगडफेक होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी जाणते राजे (शरद पवार) त्या ठिकाणी जातात. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जातात. हा संपूर्ण प्लॅन होता असंच दिसत आहे, असा आरोपही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केला आहे.

जर तुम्ही त्यात नाहीत तर घाबरण्याचे काम नाही. एसआयटी चौकशीत त्यांची स्क्रीप्ट कोन देतंय? मनोज जरांगे पाटील यांचे कॉल डिटेल्स चेक केले पाहिजे.हे षडयंत्र कोणी रचलेले आहे? हे तपासावे लागेल. मनोज जरांगे यांच्या घरी कोण गेले होते? म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचेही यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

रोहित पवार यांच्यावर निशाणा
त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. मागे काही दिवसांपू्र्वी आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरती प्रकियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावरुन आता मंत्री विखे यांनी भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्या, असं आव्हान देत आक्रमक भूमिका घेतली आहे.

मंत्री विखे म्हणाले की, तुम्ही जाहीरपणे अशी बेताल वक्तव्य करता, त्याचे पुरावे सादर करा. तुम्ही कोणाचे नातू आहेत म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचं लायसन्स मिळत नाही. त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही यावेळी विखे पाटील यांनी सांगितले.

follow us