अहमदनगर: विरोधी पक्ष नेत्यांनी कितीही आघाड्या करू द्या, कितीही यात्रा काढू द्या ? या देशाचे जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच निवडून देईल. पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देखील राजकीय पंडितांनी विश्लेषण केली तेथे फोल ठरले. तीनही राज्यांचे निकाल हे विरोधकांच्या डोळ्यात अंजन आहे अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच ज्यांना आपले पक्ष आमदार सांभाळता आले नाही ते आघाड्या करु लागले असे शाब्दिक टोले देखील मंत्री विखे यांनी लगावलेत.
‘माझ्यासाठी निर्णय घेणं सोपं नव्हतं पण’.. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत देवरांनी सांगितली ‘अंदर की बात’
नगर शहरातील महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंचावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विखे म्हणाले की विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या असल्या त्यांच्यात एकमत होत नाही. त्यांचा नेता कोण हे ठरत नाही. बैठकांचे आयोजन केले जाते. मात्र माणसे येत नसल्याने त्या बैठका पुढे ढकलण्याची नाचक्की विरोधकांवरती येते.
जितेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारखा दिसतो, याचे बाप-दादा….; संजय गायकवाडांचे टीकास्त्र
आघाडीच्या ज्या बैठक होतायत, त्या पर्यटनासाठी आहेत. बैठक त्यांची दिल्लीमध्ये पार पडली, मुंबई, या ठिकाणी देखील झाली. त्यानंतर कदाचित ते अंदमान निकोबारला देखील बैठक घेतील, असा टोलाही विखेंना लगावला आहे.
शरद पवार व उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांवर टीका केली. महाराष्ट्रमध्ये ज्यांना आपल्या पक्ष सांभाळता आला नाही. आपले आमदार सांभाळता आले नाहीत. हे लोक आता आघाड्या करायला निघाले आहेत. पंधरा वर्षे केंद्रात मंत्री राहिले. राज्यामध्ये सत्तेत राहिले मात्र एकदा तरी त्यांनी कांद्याला अनुदान देण्याचे धोरण त्यांनी घेतलं का असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.