Download App

उद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळची जोडी, मंत्री विखेंची खोचक टीका

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटी (Radhakrishna Vikhe Patil)यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. ठाकरे स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या ज्येष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखे नाचतात. आता दोघांचेही सरकार गेले, आता दोघेही एकमेकांना सल्ले देतात. सल्ले देता-घेता दोघांचेही वाटोळे झाले, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता पु्हा एकदा त्यांनी पवार आणि ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार, कॉपी पुरवणाऱ्या दोन TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा 

ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणूनच त्यांच्या पक्षातील आमदार त्यांची साथ सोडून गेले. येत्या काळात लोकसभा निवडणूक आहेत, त्या निवडणुका एकदा होऊ द्या, मग जे कोणी उरलेले आमदार, नेते आहेत, ते देखील शिल्लक राहणार नाहीत, अशी अवस्था ठाकरे गटाची होणार आहे, असं विखे पाटील यांनी म्हटले. उद्धव ठाकरे व शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ, अशी उपमा देखील यावेळी मंत्री विखेंनी दिली. निवडणुका तसेच हिंदुत्व अशा मुद्द्यांवरून मंत्री विखे यांनी ठाकरे यांच्यासह शरद पवारांवर जोरदार टीका केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार, कॉपी पुरवणाऱ्या दोन TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा 

नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी मंचावरून जोरदार राजकीय फटकेबाजी केल. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासह विरोधकांवरती जोरदार निशाणा साधला.

यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, प्रभू श्रीरामांविषयी अवमानकारक उद्गार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड करतात, आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात. हे कसलं हिंदुत्व आहे? ते काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार? औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवणाऱ्या लोकांच्या सोबत हे सत्तेसाठी जाऊन बसतात. मग याचं हिदुत्व कोणतं आहे? असा सवाल देखील यावेळी मंत्री विखे यांनी ठाकरे यांना केला.

आज देव देवतांचा अपमान होत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामध्ये त्या संबंधित पुढाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत देखील नाही. त्यामुळे त्यांनी तरी किमान हिंदुत्वाबद्दल बोलू नये, असं विखे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्ष सांभाळता आले नाहीस आपले आमदार सांभाळता आले नाही. आज ते एकत्र येऊन आघाड्या करू लागले आहेत, अशी अवस्था आता विरोधकांची झाली आहे. मात्र कितीही आघाड्या झाल्या तरी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होतील व त्यांना जनता निवडून देईल, असा विश्वास यावेळी विखे यांनी व्यक्त केला.

follow us