Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणूक? सुजय विखेंकडून चर्चांना पूर्णविराम…

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराबाबत माजी खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलंय.

Untitle (6)

Untitle (6)

Rahuri By Election : भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पुढील काही दिवसांत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी खासदार सुजय विखे (Sujay vikhe) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असतानाच सुजय विखे यांनी आपल्या उमेदवारीबाबत एकाच वाक्यात विषय संपवून टाकलायं. अक्षय कर्डिले यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी जनसामान्यांची इच्छा आहे, त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत सांगितलं असल्याचं माजी खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगरमध्ये बोलत होते.

T20 World Cup 2026 आज पहिला सेमी फायनल सामना, भिडणार न्यूझीलंड- दक्षिण आफ्रिका; कोण मारणार बाजी?

पुढे बोलताना माजी खासदार सुजय विखे म्हणाले, माझ्या नावाची चर्चा थांबली तर पक्ष मला तिकीट देईल. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक पुढील दहा दिवसांनंतर लागणार आहे. कर्डिलेंच्या निधनानंतर कार्यकर्ते संघटेची भावना आहे की, अक्षय कर्डिलेंना द्यावी. ही भावना मी मुख्यमंत्र्यांना कळवलीयं तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे ते योग्य निर्णय घेतली कर्डिलेंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केलं जाणार असल्याचं विखे यांनी स्पष्ट केलंय.

आमदार संग्राम जगतापांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’; फडणवीसांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

आठवले अन् तावडे यांना मनापासून शुभेच्छा…
राज्यसभेची उमेदवारी शरद पवारांना द्यावी की शिवसेनेला की काँग्रेसला हे त्यांनी त्यांचं ठरवावं. हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. विनोद तावडेंना संधी दिली याचा विशेष आनंद असून रामदास आठवलेंनाही पुन्हा एकदा संधी दिली. दोघांनाही मनापासून शुभेच्छा…एक सक्षम अन् सर्वसामान्य संघटकाला न्याय मिळाला
असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलयं.

ओपन एआयच्या पेंटागॉनसोबतच्या करारामुळे अमेरिकेत गोंधळ, सॅम ऑल्टमन यांनी काय दिलं स्पष्टीकरण

राज्यसभेच्या उमेदवारांची यादी महायुतीकडून जाहीर करण्यात आलीयं. यावेळी उर्वरित जागांमध्ये सुजय विखे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. याबद्दल माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर सुजय विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. ते म्हणाले, मी इथं काम करत आहे, चर्चा प्रत्येकवेळी होत असते. जेव्हा माझ्या नावाची चर्चा थांबेल तेव्हा माझा नंबर लागेल त्यामुळे चर्चा करु नका असं सुजय विखे मिश्किलपणे म्हंटले आहेत.

Exit mobile version