तनपुरे गटाला भगदाड! सडे गावातील युवकांचा कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

राहुरीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे गटाला भगदाड पडलं असून सडे गावातील युवकांनी शिवाजीराव कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं.

Untitled Design

Untitled Design

Shivajirao Kardile News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. तर उमेदवारांकडून जोरदार प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच अहिल्यानगरमधील राहरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या गटाला भगदाड पडलंय. राहुरी तालुक्यातील सडे गावातील युवकांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं. त्यामुळे आता राहुरी विधानसभा मतदारसंघात कर्डिलेंची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.

अभिनंदन माझ्या मित्रा; ट्रम्प यांच्या विजयानंतर PM मोदींची खास पोस्ट; पुढचा अजेंडाही सांगितला

युवकांच्या प्रवेशादरम्यान, बोलताना कर्डिले म्हणाले, मागील महिन्यापासून भाजपात अनेक युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे. यंदाची विधानसभा निवडणूक युवकांनी हाती घेतली असल्याचं शिवाजीराव कर्डिले यांनी स्पष्ट केलंय. युवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याची हमी दिलीयं.

अनेक प्रकल्पांतून 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती करणार; राणाजगजितसिंह पाटील यांचं आश्वासन

यावेळी माजी जि.प. सदस्य विक्रम तांबे, अण्णासाहेब बाचकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर अनिल बर्डे, सागर ननवरे, प्रफुल पानसंबळ, शंकर बर्डे, सचिन शिंदे, रामा मंचरे, आदित्य बर्डे, प्रतीक गावटे, कुणाल दातीर, आकाश भुसारे, राहुल नेटके, विशाल दहिफळे, यश पानसंबळ, सुमित पानसंबळ, श्रीकांत पानसंबळ, विशाल घोरपडे, ऋषिकेश घोरपडे, संजय घोरपडे, करण शिंदे, प्रवीण पटेकर, नवनाथ माळी, चांगदेव भोसले, भरत चौधरी, राधाकृष्ण भाटे, कौस्तुभ सरोदे, अजय साळवे, अजय माळी, संदीप बर्डे, करण माळी, आदित्य कसबे यांच्यासह अनेक युवकांनी भाजपात प्रवेश केलायं.

Exit mobile version