अभिनंदन माझ्या मित्रा; ट्रम्प यांच्या विजयानंतर PM मोदींची खास पोस्ट; पुढचा अजेंडाही सांगितला

  • Written By: Published:
अभिनंदन माझ्या मित्रा; ट्रम्प यांच्या विजयानंतर PM मोदींची खास पोस्ट; पुढचा अजेंडाही सांगितला

PM Modi Post After Donald Trump Victory : अमेरिकेतील राष्ट्राध्यपदाची निवडणूक जिंकल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आपण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू या असे ट्रम्प यांच्या विजयानंतर मोदी यांनी एक्सवर केलेल्या खास पोस्टमध्ये म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी 277 इलेक्टोरल जागा जिंकल्या तर, कमला हॅरिस यांनी 226 इलेक्टोरल जागा जिंकल्या आहेत. यात सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकाडा 270 जागा आवश्यक आहेत.

मोदींची पोस्ट नेमकी काय?

डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  एक्सवर पोस्ट करत ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. यात मोदीजी म्हणतात की, “माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.” मी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि त्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक असून, आपण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू या असे म्हटले आहे.

जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा ‘ट्रम्प’ यांच्या हातात; राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी कसा होतो?

निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया काय?

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित करतना सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याच म्हटलं आहे. हा एक राजकीय विजय असून, असा विजय देशाने कधी पाहिलेला नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 47 वा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करताना आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार असल्याची ग्वाहीदेखील ट्रम्प यांनी दिली आहे. प्रत्येक दिवस देशातील नागरिकांसाठी लढणार असल्याचे म्हणत अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube