Download App

राष्ट्रवादीला भगदाड! कर्डिलेंच्या खेळीने राहुरीत निकाल बदलणार का? मोठ्या नेत्याच्या हाती ‘कमळ’

राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिलेंच्या खेळीने निकाल बदलणार असून शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, भास्कर गाडे यांनी भाजपात प्रवेश केलायं.

Shivajrao Kardile : राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून शिवाजीराव कर्डिले (Shivajrao Kardile) यांना उमेदवारी जाहीर झाली असून उमदेवारी जाहीर झाल्यापासून कर्डिले गटात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु आहे. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गाडे यांनी आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं. राहुरी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश झाल्याने राहुरी विधानसभेचा निकाल बदलणार असल्याची चर्चा सुरु झालीयं.

अजब महाराष्ट्राचे गजब राजकारण : आमदारकीच्या हव्यासापोटी विभागली गेलेली राजकीय कुटुंब

राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांकडून उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्याच यादीत शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीत सक्रिय असलेले धनराज गाडे आणि भास्कररा गाडे यांनी आज भाजपात प्रवेश केल्याने राहुरीत राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलं आहे.

तमन्ना नव्या प्रोजेक्टसह चाहत्यांच्या भेटीला! जिमी शेरगिल अन् अविनाश तिवारीसोबत दिसणार ‘सिकंदर का मुकद्दर’मध्ये

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून शिवाजी कर्डिले यांचा दांडगा जनसंपर्क आहे. या मतदारसंघातून कर्डिले सलग दोनवेळा विधानसभेवर गेले आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदार असताना शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळेच आज कर्डिले गटात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु असल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून कर्डिले यांच्या उपस्थितीत दररोज कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचाच विजय होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

अभिनेता अंकित मोहन म्हणतोय ‘झालोया मी पैलवान…’; बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित!

दरम्यान, 2019 नंतर यंदाही भाजपने कर्डिलेंना संधी दिली आहे. तर विरोधात शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या आखाड्यात असणार आहेत. त्यामुळं राहुरीत पुन्हा कर्डिले आणि तनपुरे यांच्यातच सामना होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत 2019 च्या पराभवाचा वचपा कर्डिले कसा काढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us