Shivajirao Kardile News : राहुरी विधानसभा मतदारसंघातील (Rahuri Assembly Constitueny) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेकडून पाठिंबा देण्यात आलायं. यासंदर्भातील पत्र प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर, अण्णासाहेब बाचकर, बापूसाहेब वडितके यांनी दिलंय. धनगर समाज बांधवांच्या पाठिंब्यामुळे मतदारसंघात कर्डिले यांची ताकद दुप्पट वाढली असल्याचं बोललं जातंय.
काही दिवसांपूर्वीच राहुरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांवर दमदाटी करण्याचा प्रकार घडल्याचं दिसून आलं. नागरिकांनी या दमदाटीला घाबरु नये, आपण सर्व कर्डिलेंच्या पाठिशी उभे राहू असं आवाहन दत्तात्रय खेमनर यांनी यावेळी केलंय.
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही” ; देवेंद्र फडणवीस भरसभेत कडाडले
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विद्यमान आमदार आहेत. कर्डिलेंना पुन्हा उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असलेले धनराज गाडे आणि भास्करराव गाडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने राहुरीत राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय.
‘आप’चा निर्धार, राहुल दादांना विजयी मताधिक्य देणार, आम आदमी पक्षाचा विजयी संकल्प कार्यकर्ता मेळावा
कर्डिले गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. भाजपने 2019 नंतर पुन्हा शिवाजी कर्डिले यांना तिकीट दिलंय. विरोधामध्ये शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. त्यामुळं राहुरीत पुन्हा कर्डिले आणि तनपुरे यांच्यातच अटीतटीचा सामना होणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये 2019 च्या पराभवाचा वचपा कर्डिले काढणार का? हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे.