Download App

धक्कादायक घटना! वकील पत्र घेतलेल्या आरोपीने खंडणीसाठी वकील दाम्पत्याला संपवलं 

  • Written By: Last Updated:
Rahuri News : राहुरी न्यालायात (Rahuri court) वकिली करणाऱ्या आढावा दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. अॅड. राजाराम जयवंत आढाव (Rajaram Jaywant Aadhav) (वय – 52) आणि ॲड. मनीषा आढाव (वय- 42) असं या मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील (Rahuri Police) उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आल्यानं एकच खबळब उडाली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी चा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
अखेर INDIA आघाडीचे घोडे गंगेत न्हाले; उत्तर-प्रदेशमध्ये सपा-काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला!
सविस्तर वृत्त असे की, राजाराम जयवंत आढाव आणि मनिषा राजाराम आढाव हे वकिल दांम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी या गावी वास्तव्याला आहे. 25 जानेवारीला ते आपल्या घरुन राहुरी कोर्टामध्ये गेले होते. मात्र, ते घरी परत न आल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचेशी संपर्क केला. मात्र, संपर्क  होऊ न शकल्याने राहुरी पोलीस स्टेशनध्ये वकिल दांम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
IND vs ENG: ऑली पोपचं चिवट शतक! इंग्लड संघाचा जबरदस्त पलटवार, उडवली भारताची झोप
वकिल दाम्पत्या बेपत्ता झाल्यानं पोलीस अधिक्षक राकेश ओला  यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोनि दिनेश आहेर यांना  आढाव वकिल दांम्पत्याचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. त्यानंतर  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांने मानोरी ते राहुरीकडे जाणाऱ्या रोडवरील आणि राहुरी  कोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले.  यावेळी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेल्याचं दिसून आलं. या कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकिल दांम्पत्याकडे असल्याचे पोलीसांना कळलं. शिवाय,  सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसून  आलेली संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने किरण दुशींग (किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग वय 32 वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली. त्याने आपले साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर),  शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी),  हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर),  बबन सुनिल मोरे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांना सोबत घेऊन कट केला. कटाप्रमाणे, वकील दांम्पत्याला बोलावून त्यांच्याकडे 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यानं  दाम्पत्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालून खुन केला. त्यानंतर उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये मृत देहांना दगड बांधुन फेकून दिले.
https://www.youtube.com/watch?v=9iOiXGEiRpI
दरम्यान, पोलिसांनी आरोपी किरण दुशींग याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे यांना ताब्यात घेतले घेतले. किरण दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी खुन, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
follow us