Download App

अहिल्यानगरची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी; रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar on Maharashtra Kesari Wrestling Tournament : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध कारणांमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. यावर राजकीय वर्तुळातून देखील टीकेची झोड उठली. यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा कर्जत-जामखेडला घेणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी. असा प्रश्न देखील उपस्थित केला.

महायुतीमध्ये धुसफूस, कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी, नेमकं काय घडलं?

रोहित पवार यांनी एक्स या त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून या स्पर्धेत शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला.

एका जत्रेत देव म्हातारा होत नाही; कुस्ती संघाच्या कार्याध्यक्षांनी राक्षेला सल्ला देत टोचले कान

केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे.

आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल.. आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो.’

शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध कुठून लावला…, विखेंचा राहुल गांधींना सवाल

कुस्तीप्रेमींचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून असलेल्या नांदेडचा डबल केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा पराभव झाला. मात्र पंचांनी आपल्या विरोधात निर्णय दिलेला असून ही मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप करत राक्षे यांनी थेट मंचावरूनच पंचांना धक्काबुक्की करत लाथ मारल्याने ही स्पर्धा अत्यंत वादग्रस्त ठरली.

तर अंतिम सामन्यांमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये सामना झाला, तर गायकवाड यांनी देखील मैदानातून निघून गेले अन् मोहोळ विजय ठरले. मोहोळ हे जरी महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले असले तरी मात्र शिवराज राक्षे यांच्याकडून झालेले पंचाला मारहाण असो किंवा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे ही अत्यंत वादग्रस्त ठरली.

follow us