एका जत्रेत देव म्हातारा होत नाही; कुस्ती संघाच्या कार्याध्यक्षांनी राक्षेला सल्ला देत टोचले कान
Maharashtra Kesari Wrestling Tournament : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध कारणांमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्याशी लेटस्अप मराठीने दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी बोलताना ते म्हटले की, यावेळी पंचाला मारहाण करणं चुकीचंच असल्याचं म्हणत भोंडवे यांनी शिवराज राक्षेलाच चुकीच ठरवलं.
शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध कुठून लावला…, विखेंचा राहुल गांधींना सवाल
यावेळी बोलताना भोंडवे म्हणाले की, कुस्तीतील आंतरराष्ट्रीय नियमाला धरूनच महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेचा निकाल लागला. मात्र शिवराज राक्षे या कुस्तीगिराला काही आक्षेप घ्यायचा असल्यास त्याने तक्रार दाखल करायला हवी त्यानंतर संघटनेकडून पंच दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र अशा प्रकारे पंचांना मारहाण करणं योग्य नाही. अशा घटना घडल्यास पायंडा पडेल.
मोठी बातमी! सरकारी, निमसरकारी आणि पालिकांमध्ये मराठी भाषा अनिवार्य
त्याचबरोबर कोणत्याही कुस्ती स्पर्धांसाठी पंच म्हणून कोणतेही पैलवान तयार होणार नाहीत. जेणेकरून कुस्ती स्पर्धा घेणे अशक्य होईल असं म्हणत भोंडवे यांनी पंचांना मारहाण करणाऱ्या त्याचबरोबर निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या शिवराज राक्षेला सल्ला देत त्याचे कान टोचले आहेत. त्याचबरोबर राक्षेची ही राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्याला अजूनही देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी आहे. तो खेळू शकतो. मात्र अशा प्रकारे पंचांना मारण्याची प्रकार भविष्यात घडू नये त्यासाठी राक्षेवर कारवाई करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
Chandrashekhar Bawankule : अबब! राज्यात तब्बल दोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जाणार
कुस्तीप्रेमींचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून असलेल्या नांदेडचा डबल केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा पराभव झाला. मात्र पंचांनी आपल्या विरोधात निर्णय दिलेला असून ही मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप करत राक्षे यांनी थेट मंचावरूनच पंचांना धक्काबुक्की करत लाथ मारल्याने ही स्पर्धा अत्यंत वादग्रस्त ठरली.
तर अंतिम सामन्यांमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये सामना झाला, तर गायकवाड यांनी देखील मैदानातून निघून गेले अन् मोहोळ विजय ठरले. मोहोळ हे जरी महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले असले तरी मात्र शिवराज राक्षे यांच्याकडून झालेले पंचाला मारहाण असो किंवा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे ही अत्यंत वादग्रस्त ठरली.