महाराष्ट्र केसरीच्या वादात सापडलेल्या ‘त्या’ पंचांना दणका; शिवराज राक्षेनंतर नितीश कबालियेंचं निलंबंन

Umpires Nitish Kabaliyen involved Maharashtra Kesari controversy suspended After Shivraj Rakshe : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा (Shivraj Rakshe) पराभव झाला. मात्र पंचांनी आपल्या विरोधात निर्णय दिलेला आहे. मॅच फिक्सिंगचा (Maharashtra Kesari) आरोप करत राक्षे यांनी थेट मंचावरूनच पंचांना धक्काबुक्की करत लाथ मारल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता या लाथ मारलेल्या पंचांना कुस्ती संघटनेने मोठा दणका दिला आहे. त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
शेड्यूल फिक्स, बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच भारत खेळणार टी-20 मालिका, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
यावर बोलताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस म्हणाले की, अहिल्यानगर शहरात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत निर्माण झालेल्या वादावर चोकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच असलेल्या विलास कुचरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या अहवाला नुसार शिवराज राक्षे दोषी आहेच पण नितीश कबालिये पण दोषी आहेत. त्यामुळे त्यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्यांना कुठेही राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहता येणार नाही. तर यावर त्यांनी 7 दिवसांत अहवाल सादर केल्यास आम्ही पुन्हा दुसरी समिती नेमून त्यात ते दोषी आढळले नाही तर त्यार विचार केला जाईल असंही तडस म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध कारणांमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्याशी लेटस्अप मराठीने दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी बोलताना ते म्हटले की, यावेळी पंचाला मारहाण करणं चुकीचंच असल्याचं म्हणत भोंडवे यांनी शिवराज राक्षेलाच चुकीच ठरवलं.
यावेळी बोलताना भोंडवे म्हणाले की, कुस्तीतील आंतरराष्ट्रीय नियमाला धरूनच महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेचा निकाल लागला. मात्र शिवराज राक्षे या कुस्तीगिराला काही आक्षेप घ्यायचा असल्यास त्याने तक्रार दाखल करायला हवी त्यानंतर संघटनेकडून पंच दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र अशा प्रकारे पंचांना मारहाण करणं योग्य नाही. अशा घटना घडल्यास पायंडा पडेल.
तेलंगाणात आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेअर लागू करण्याचा निर्णय, वंचितने कॉंग्रेसला घेरलं
त्याचबरोबर कोणत्याही कुस्ती स्पर्धांसाठी पंच म्हणून कोणतेही पैलवान तयार होणार नाहीत. जेणेकरून कुस्ती स्पर्धा घेणे अशक्य होईल असं म्हणत भोंडवे यांनी पंचांना मारहाण करणाऱ्या त्याचबरोबर निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या शिवराज राक्षेला सल्ला देत त्याचे कान टोचले आहेत. त्याचबरोबर राक्षेची ही राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्याला अजूनही देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी आहे. तो खेळू शकतो. मात्र अशा प्रकारे पंचांना मारण्याची प्रकार भविष्यात घडू नये त्यासाठी राक्षेवर कारवाई करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार; राज्य कॅबिनेट बैठकीत 7 महत्वाचे निर्णय
कुस्तीप्रेमींचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून असलेल्या नांदेडचा डबल केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा पराभव झाला. मात्र पंचांनी आपल्या विरोधात निर्णय दिलेला असून ही मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप करत राक्षे यांनी थेट मंचावरूनच पंचांना धक्काबुक्की करत लाथ मारल्याने ही स्पर्धा अत्यंत वादग्रस्त ठरली. तर अंतिम सामन्यांमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये सामना झाला, तर गायकवाड यांनी देखील मैदानातून निघून गेले अन् मोहोळ विजय ठरले. मोहोळ हे जरी महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले असले तरी मात्र शिवराज राक्षे यांच्याकडून झालेले पंचाला मारहाण असो किंवा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे ही अत्यंत वादग्रस्त ठरली.