VIDEO : ते माझे काकाच…दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र केसरी, पृथ्वीराज मोहोळ यांनी केला मोठा खुलासा

VIDEO : ते माझे काकाच…दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र केसरी, पृथ्वीराज मोहोळ यांनी केला मोठा खुलासा

Maharashtra Kesari Pruthviraj Mohol Exclusive interview : यंदाचे महाराष्ट्र केसरी ठरलेत पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol). ही स्पर्धा नुकतीच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये पार पडली. यावेळी पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांनी पंचांचा निर्णय चुकीचा ठरवला अन् स्पर्धेच्या स्थळी चांगलंच वादंग निर्माण झालं होतं. विजयानंतर महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पृथ्वीराज मोहोळ यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिलीय. यावेळी त्यांनी झालेल्या वादावर तसेच विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलंय.पृथ्वीराज मोहोळ नेमकं काय म्हणालेत, ते सविस्तर पाहू या.

Maharashtra Kesari : महाराष्ट्रात पहिल्यांदाच रंगणार महिलांच्या महाराष्ट्र कुस्तीचा थरार

यावेळी लेट्सअप मराठीसोबत बोलताना पृथ्वीराज मोहोळ मोहोळ (Maharashtra Kesari Priuthviraj Mohol) म्हटले की, स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. 1999 साली माझे वडिल महाराष्ट्राचे उपकेसरी राहिलेत. ते फायनलला हारले होते. त्यांचं स्वप्न होतं की, मी महाराष्ट्र केसरी व्हावं. त्यांनी तशी तयारी माझ्याकडून करून घेतली होती. तयारी लहानपणापासून सुरू होती. पण महाराष्ट्र केसरीची तयारी ही मागील एका वर्षापासून सुरू असल्याचं पृथ्वीराज मोहोळ यांनी म्हटलंय.

माझ्याविषयी कोणताच वाद नाही, मला जे काम करायचं होतं ते केलं. कोचने जे शिकवलं होतं, ते केलं. शिवराज राक्षेंनी पंचाला लाथ मारली, या घटनेचा निषेध पृथ्वीराज मोहोळ यांनी केलाय. व्हिसल वाजल्यामुळे मी सोडून दिलं अन् पंचांनी मला विजय दिला, असं ते म्हणालेत. मी फोन बघितला नाहीये. शिवराज राक्षे त्यांचं दुखणं मांडत आहेत. यावर पृथ्वीराज म्हणाले की, मी पैलवानच आहे. कधीही कुस्तीसाठी पैलवान तयार असतो. कधीही कुस्ती घेतली तरी मी तयारीतच आहे.

मागील वेळी सुद्धा माझ्यासोबत सिकंदर होता. त्या कुस्तीत थेट पॉईंट दिला होती. मी त्यावेळी संयम दाखवला होता. संपूर्ण महाराष्ट्र कुस्ती पाहात होता, त्यात मला हरवलं गेलं. पण मी नंतर एक वर्ष पुन्हा तयारी केली. वाईट वाटतं, एवढे कष्ट केलेले असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं. स्पर्धा झाल्यानंतर माझं शिवराजसोबत बोलणं झालेलं नाही. ते सिनिअर आहेत, मी नंतर त्यांची भेट घेवून आशिर्वाद घेईन.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विजयानंतर पृथ्वीराजला मिठी मारली. यावर बोलताना पृथ्वीराज म्हणाले की, मुरलीधर मोहोळ माझे काकाच आहेत. ते विजय पाहून भावनिक झाले होते. सोशल मीडियावरील कमेंट्सवर बोलताना शिवराज म्हणाले की, त्यांनी दोन वर्षापू्र्वी कोथरूडला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा घेतली होती. त्यावेळी मी हारलो होतो, जर तसंच असतं, तर मी दोन वर्षापूर्वीच महाराष्ट्र केसरी झालो असतो. पैलवानाचं शेड्युल ठरलेलं असतं. त्यात खुराक, आराम सगळं असतं. विजयाने हुरळून जावू नका अन् पराजयाने खचू नका, असं आवाहन नवख्या कुस्तीपटूंना महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube